मनपा विशेष समितीच्या सभापतीसाठी इच्छुकांची फिल्डींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:40 PM2020-10-16T23:40:11+5:302020-10-16T23:41:14+5:30
Municipal Special Committee Chairman मनपाच्या विशेष समितीच्या सभापतिपदासाठी भाजप नगरसेवकांनी फिल्डींग लावणे सुरु केले आहे. येत्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत विशेष समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या विशेष समितीच्या सभापतिपदासाठी भाजप नगरसेवकांनी फिल्डींग लावणे सुरु केले आहे. येत्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत विशेष समितीच्या सदस्यांच्या नाावांची घोषणा करण्यात येईल. संख्याबळाचा विचार केल्यास भाजपला इतर पक्षांचे आव्हान मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याचवेळी सभापतींच्या नाावांचीही घोषणा केली जाईल. या पाार्श्वभूमीवर इच्छुक नगरसेवकांनी आमदारांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
१० विशेष समितींमध्ये बहुतांश समितींचे सभापती व उपसभापती बदलण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. कामाच्या आधारावर काही समितींच्या सभापतींना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. जलप्रदाय समितीचे प्रमुख पिंटू झलके आता स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आहेत. शिक्षण समितीचे दिलीप दिवे तीन वेळा सभापती राहिले. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सभापती येण्याची अधिक शक्यता आहे. विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम कामकाज पाहत आहेत. सत्तापक्षाने त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तेव्हा त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो हे वेळेवरच समजेल.स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती, आरोग्य समिती, क्रीडा समिती, माागास वस्ती निर्मूलन समिती, महिला व बाल कल्याण समिती, कर संकलन समिती, अग्निशमन समितीचे चेहरे बदलण्याची शक्यता आहे.
जून महिन्यातच समित्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे समितींच्या नवीन सदस्यांच्या नाावाची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता समितींच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३० (१) अंतर्गत १० विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीत ९ सदस्य राहतील. यात मनपा सभागृहातील नगरसेवकांच्या संख्येच्या आधारावर प्रत्येक समितीत भाजपचे ६, काँग्रेसचे २ आणि बसपाचा १ सदस्य असेल.
महिला नगरसेवकांना कधी मिळणार संधी
मनपात ५० टक्केपेक्षा अधिक महिला नगरसेवक आहेत. यात दोन तृतियांश महिला भाजपच्या आहेत. केवळ नावासाठी त्यांना समितीत सदस्य बनविले जाते. परंतु सभापती व उपसभापतिपदी त्यांना संधी दिली जाात नाही. यामुळे महिला नगरसेविकंमध्ये असंतोष आहे. यावेळी किती महिला नगरसेवकांनाा संधी दिली जाते, हे वेळेवरच समजेल.