Corona Virus in Nagpur; नागपुरात पाचवा कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 05:49 PM2020-03-26T17:49:55+5:302020-03-26T17:50:44+5:30

कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्याचवेळी पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

Fifth corona positive in Nagpur | Corona Virus in Nagpur; नागपुरात पाचवा कोरोनाबाधित रुग्ण

Corona Virus in Nagpur; नागपुरात पाचवा कोरोनाबाधित रुग्ण

Next
ठळक मुद्देकुटुंबियामध्येही लक्षणे दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी

 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्याचवेळी पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा रुग्ण १८ मार्चपासून नागपुरात आहे. दोन दिवसांपूर्वीपासून लक्षणे आढळून आल्याने बुधवारी मेडिकलमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी नमुने पॉझिटिव्ह आले. प्राप्त माहितीनुसार, त्यांच्यापूर्वी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांनी मेडिकलमध्ये नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. परंतु आता पुन्हा त्यांचे नमुने तपासले जाणार आहे. व्यवसायाच्यानिमित्ताने ४२ वर्षीय हा पुरुष रुग्ण दिल्लीला गेले होते. १८ मार्च रोजी ते घरी परतले. सुरूवातील काही दिवस प्रकृती ठिक होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आदींचा त्रास वाढला. हीच लक्षणे त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांमध्ये होती. यामुळे मंगळवारी त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन नमुन्याची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले. बुधवारी यांनीही आपल्या नमुन्याची तपासणी केली. परंतु आज सकाळी नमुने पॉझिटिव्ह येताच सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे, त्यांनी दिल्ली ते नागपूर हा प्रवास रेल्वेतून केला आहे, आणि गेल्या आठ दिवसांपासून ते नागपुरात आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेतली जात आहे. - संपर्कात आलेल्यांनी मेयो, मेडिकलशी संपर्क साधा-लोकमतचे आवाहन कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. आज पॉझिटिव्ह आलेला पाचवा रुग्ण रेल्वेतून प्रवास करून नागपुरात आला आहे. शिवाय, गेल्या आठवड्यापासून नागपुरातच आहे. सुरूवातीचे काही दिवस त्यांनी आपल्या दुकानातही काढल्याची माहिती आहे. या दरम्यान कोणी त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:हून मेडिकल किंवा मेयो रुग्णालयाच्या ‘कोव्हीड-१९’ ओपीडीशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक भावनेतून ‘लोकमत’ने केले आहे

 

 

 

 

Web Title: Fifth corona positive in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.