कचरा टाकण्यावरून दोन महिलांत 'फ्री-स्टाईल'; वस्तीतील नागरिक बनले दर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 06:28 PM2021-12-01T18:28:10+5:302021-12-02T13:39:43+5:30
कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी एक-मेकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी दर्शक बनून या 'फ्री-स्टाईल'चा आनंद घेतला. अन् शेवटी हे प्रकरण ठाण्यापर्यंत गेलं.
नागपूर : आजकाल लहान-सहान गोष्टींवरुन झालेल्या वादाचे रुपांतर मारहाणीत व्हायला वेळ लागत नाही अशीच एक घटना नागपुरात समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलांमध्ये कचरा टाकण्यावरुन वाद झाला आणि काही कळण्याच्या आतच 'फ्री-स्टाईल' झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी दर्शक बनून या फ्री-स्टाईलचा आनंद घेतला. अन् शेवटी हे प्रकरण ठाण्यापर्यंत गेलं.
कचरा टाकण्यावरून दोन महिलांमध्ये मारहाण झाल्याची ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गीता विष्णु बारापात्रे (४८) रा. प्लॉट नं. ५५१, गल्ली नं. २०, विनोबा भावेनगर असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. या दोन्ही महिला एकाच वस्तीत राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन बरेचदा खटके उडाले आहेत.
मंगळवारीही अशाच कचरा टाकण्याच्या कारणावरून दोघींमध्ये वाद झाला आणि शब्दाने शब्द वाढत जाऊन त्याचे मारहाणईत रुपांत झाले. दरम्यान, आरोपी महिलेने चित्रपटातील हिरोप्रमाणे अश्लिल शिवीगाळ करून हाथबुक्कीचा मार दिला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गीता यांच्या तक्रारीवरुन आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.