सांडपाण्यावरून दाेन कुटुंबांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:47+5:302021-09-13T04:08:47+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : बाथरूम व शाैचालयाचे सांडपाणी घराच्या अंगणातून वाहत असल्याच्या कारणावरून दाेन कुटुंबांत जाेरदार ‘फ्री स्टाइल’ ...

Fighting in Daen families over sewage | सांडपाण्यावरून दाेन कुटुंबांत हाणामारी

सांडपाण्यावरून दाेन कुटुंबांत हाणामारी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : बाथरूम व शाैचालयाचे सांडपाणी घराच्या अंगणातून वाहत असल्याच्या कारणावरून दाेन कुटुंबांत जाेरदार ‘फ्री स्टाइल’ हाणामारी झाली. यात दाेन्ही कुटुंबांतील काही जण जखमी झाले. हा वाद पाेलीस ठाण्यात पाेहाेचल्यानंतर दाेन्ही कुटुंबांतील आठ जणांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, चाैघांना अटक केली आहे. ही घटना नक्षी (ता. भिवापूर) येथे रविवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास घडली.

याप्रकरणी फिर्यादी कीर्ती रामकृष्ण ठाकरे, रा. नक्षी यांच्या तक्रारीवरून रवींद्र भाऊराव करकाडे, गजानन भाऊराव करकाडे, सुरेश भाऊराव करकाडे, आकाश रवींद्र करकाडे, सर्व रा. नक्षी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तर फिर्यादी रवींद्र भाऊराव करकाडे यांच्या तक्रारीवरून श्रावण ठाकरे, रामकृष्ण श्रावण ठाकरे, कीर्ती रामकृष्ण ठाकरे व माला ठाकरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे.

कीर्ती ठाकरे यांच्या तक्रारीनुसार फिर्यादी व आराेपींचे घर लागून आहे. आरोपीच्या बाथरूमचे सांडपाणी फिर्यादीच्या अंगणात येत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावरून कीर्तीने रविवारी हटकले असता आराेपीने वाद घालत तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. अशात तिचे पती भांडण सोडविण्यास गेले असता, आरोपींनी त्यांच्या डाेक्यावर वीट मारली. या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आराेपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. तर याच घटनेत फिर्यादी असलेले रवींद्र भाऊराव करकाडे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या बाथरूमचे पाणी आरोपींनी अडविल्यामुळे राहत्या घरात ओलावा येत असल्याबाबत हटकले असता, आरोपींनी वाद घालत मारण्याची धमकी दिली. शिवाय घरातून मिरची पावडर आणत फिर्यादीच्या अंगावर फेकले. फिर्यादीचे कुटुंबीय वाद सोडविण्यास आले असता, आरोपींनी त्यांना लोखंडी सबलीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दाेन्ही फिर्यादीच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भगवानदास यादव करीत आहेत.

Web Title: Fighting in Daen families over sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.