नाश्त्याच्या बिलावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:20+5:302021-08-17T04:14:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : दाेघांनी नाश्ता केल्यानंतर चायनीज खाद्यपदार्थाचे पैसे न दिल्याने वादाला ताेंड फुटले. त्यातच त्या दाेघांनी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : दाेघांनी नाश्ता केल्यानंतर चायनीज खाद्यपदार्थाचे पैसे न दिल्याने वादाला ताेंड फुटले. त्यातच त्या दाेघांनी विक्रेत्यास बेदम मारहाण केल्याने ताे गंभीर जखमी झाला. यातील एका आराेपीस पाेलिसांनी अटक केली आहे. ही घटना काटाेल शहरात रविवारी (दि. १५) सायंकाळी घडली.
सावन महेंद्रसिंग कुशवाह (२३, रा. शारदा चाैक, काटाेल) असे जखमी खाद्यपदार्थ विक्रेत्याचे तर शुभम जितेंद्र रंगारी (२४, रा़ हत्तीखाना, काटोल) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. सावन व त्याचा धाकटा भाऊ आकाश (२०) शहरातील तहसील कार्यालय परिसरात चायनीज खाद्यपदार्थाचा ठेला लावून विक्री करतात.
शुभम व त्याचा भाऊ राहुल माेटरसायकलने सावनच्या ठेल्याजवळ आले. नाश्ता केल्यानंतर त्यांनी बिल न दिल्याने सावनने विचारणा केली. त्यावर दाेघांनीही त्याच्याशी भांडायला सुरुवात केली. दाेघांनीही सावन व आकाशला काठी व दगडाने मारहाण केली. यात सावनच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. दाेघेही पळून गेल्यानंतर सावनला काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले.
याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी आकाश कुशवाह याच्या तक्रारीवरून भादंवि ३२६, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी शुभमला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची अर्थात बुधवार (दि. १८) पर्यंत पाेलीस काेठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले करीत आहेत.