वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:21+5:302021-07-11T04:07:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात एक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेरविहरा शिवारात शनिवारी (दि. १०) सायंकाळी ४.३० वाोताच्या सुमारास घडली.
मारोती चिंधू खाटे (५५) यांनी चोरविहरा (ता. भिवापूर) शिवारात शेती विकत घेतली. महसूल विभागाकडून त्यांनी त्यांच्या शेतात जाणारा रस्ताही मिळवून घेतला. मात्र, शेषराव रंदई व लीलाधर चौधरी हे दाेन्ही शेतकरी त्यांना त्या रस्त्याने जाण्यास प्रतिबंध करायचे. दरम्यान, माराेती खाटे शनिवारी सायंकाळी त्या रस्त्याने जात असताना माराेती व लीलाधर यांनी त्यांना अडविले. येथून तुझा रस्ता नाही, असे बजावत भांडणाला सुरुवात केली. काही वेळात शेषराव व लीलाधर यांनी माराेती खाटे यांच्या पायावर कुऱ्हाडीच्या दांड्याने वार केले.
मदतीला कुणीही न धावल्याने ते बराच वेळ शेतात जखमी अवस्थेत पडून हाेते. एका शेतकऱ्याने त्यांना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी भादंवि ३२४, ३२५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगुले व संदेश रामटेक करीत आहेत.
100721\img-20210710-wa0204.jpg
पंचनामा करीत असतांना भिवापूर पोलिस