कापलेला वीजपुरवठा जोडणाऱ्या आप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:17+5:302021-04-01T04:08:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित केल्यावर तो अवैधपणे जोडणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात ...

File case against AAP workers | कापलेला वीजपुरवठा जोडणाऱ्या आप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

कापलेला वीजपुरवठा जोडणाऱ्या आप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित केल्यावर तो अवैधपणे जोडणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गड्डीगोदाम परिसरात राहणारे मोहम्मद इब्राहीम मोहम्मद याकूब या वीज ग्राहकाकडे १ लाख २९ हजार ९७० रुपयांची थकबाकी होती. महावितरणकडून वारंवार पाठपुरावा करूनही मोहम्मद इब्राहीम मोहम्मद याकूब दाद देत नसल्याने महावितरणचे सहायक अभियंता रेवत येसांबरे यांनी शाखा कार्यालयातील सहकारी निखिल घायवट, मोरेश्वर पटले, प्रकाश बडोले यांना सोबत घेऊन थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा २५ मार्च रोजी खंडित केला. वीजपुरवठा खंडित केल्यावर महावितरणकडून वीज ग्राहकाचे वीज मीटर आणि सर्व्हिस वायरपण जप्त करण्यात आली होती. यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत वाघ, कविता सिंघल, प्रभात अग्रवाल, अलका पोपटकर यांनी थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीजपुरवठा अवैधपणे जोडला. तसेच उपस्थित जनतेसमोर महावितरणविरोधात चिथावणीखोर भाषण केले. या घटनेची माहिती सहायक अभियंता रेवत येसांबरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, थकबाकीदार वीज ग्राहकाने थेट वीजपुरवठा जोडल्याचे आढळून आले. महावितरणकडून पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थितांनी यात आडकाठी आणली. तसेच वीजपुरवठा दबाव आणून सुरू करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महावितरणकडून सदर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्या आधारे पोलिसांनी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत वाघ, कविता सिंघल, प्रभात अग्रवाल, अलका पोपटकर यांच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा कलम १३५, १३८. भादंवि कलाम १८६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सदर पोलीस करीत आहेत.

सक्करदरा आणि नंदनवन ठाण्यातही गुन्हा दाखल

महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यावर तो पुन्हा अवैधपणे जोडून दिल्याप्रकरणी महावितरणकडून सक्करदरा आणि नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जवाहरनगर येथील वीज ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यावर तो पुन्हा जोडून दिल्याप्रकरणी सहायक अभियंता श्रीराम मुत्तेमवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी वीज ग्राहक राजेश तिवारीसह पीयूष आकरे, मनोज डफरे, संजय जीवतोड, अमोल मुळे, संजय अनासने, शुभम पारले, विकास नागराळे, अमोल गिरडे यांच्या विरोधात विदुयत कायदा कलम १३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संत गाडगे बाबा नगरातील सत्यफुलाबाई उराडे यांच्याकडे वीज देयकाची थकबाकी होती. महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यावर त्यांचा मुलगा राकेश उराडे याने आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वीजपुरवठा अवैधपणे जोडून घेतला.

Web Title: File case against AAP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.