विनापरवानगी निदर्शने करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 09:22 PM2020-09-11T21:22:10+5:302020-09-11T21:23:42+5:30

कोरोनामुळे एकत्रित जमण्यास किंवा गर्दी करण्यास प्रतिबंध असताना कोणतीही परवानगी न घेता विद्युत भवन एमएसईबी कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी गर्दी करून निदर्शने करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमविण्याचा गुन्हा दाखल केला.

File a case against your activists for protesting without permission | विनापरवानगी निदर्शने करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

विनापरवानगी निदर्शने करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे कोरोनाचा धोका वाढविला : वाहतुकीस अडसर निर्माण केला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे एकत्रित जमण्यास किंवा गर्दी करण्यास प्रतिबंध असताना कोणतीही परवानगी न घेता विद्युत भवन एमएसईबी कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी गर्दी करून निदर्शने करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमविण्याचा गुन्हा दाखल केला.
नागपुरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रोज रुग्ण निघत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन, निदर्शने करण्यास मनाई आहे. या पार्श्वभूमीवर, जुना काटोल नाका चौकातील विद्युत भवनासमोर जमलेल्या मंडळींनी गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास नारे निदर्शने केली. उपरोक्त मंडळींनी कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढवितानाच गर्दी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे या सर्वांवर सदर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच गैरकायद्याची मंडळी जमविण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये देवेंद्र वानखेडे, जगदीश सिंग, अजय धरणे, अजय केदारनाथ मिश्रा,आकाश काळे, भूषण ढाकुलकर, शंकर इंगोले, रोशन डोंगरे, आमिर अन्सारी, सचिन पारधी, सुशांत बोरकर, जयेंद्र चव्हाण, पुष्पा डाबरे यांच्यासह अन्य १२ ते १५ जणांचा समावेश आहे.

Web Title: File a case against your activists for protesting without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.