भ्रष्टाचारी ग्रामपंचायत सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 09:59 PM2018-08-02T21:59:44+5:302018-08-02T22:00:28+5:30
उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कराबाबत चुकीची माहिती दिल्यामुळे खंडविकास अधिकारी याच्यावर कारवाई करावी व एलईडी लाईट खरेदी प्रकरणातील दोषी सचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कराबाबत चुकीची माहिती दिल्यामुळे खंडविकास अधिकारी याच्यावर कारवाई करावी व एलईडी लाईट खरेदी प्रकरणातील दोषी सचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नवेगाव साधू येथील तत्कालीन ग्रामसचिव पंजाबराव चव्हाण व सरपंच यांनी २०१५ ते १७ या कालावधीत ग्रामपंचायतीला विविध माध्यमातून प्राप्त झालेला निधी परस्पर खर्च केला. या प्रकरणाची पंचायत विभागाच्या खंड विकास अधिकाºयाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. यात चव्हाण व सरपंचाने नवेगाव साधू ग्रा.पं.अंर्तगत येणाºया ४० ले-आऊट, १२०० खाली भूखंड, ३०० वर घरे आदींवरील गेल्या तीन वर्षांपासून प्राप्त कराच्या रकमेपैकी काही रक्कम बँकेत जमा करून उर्वरित ९७ हजारावरची रक्कम ही परस्पर खर्च केली. तसेच ग्रा.पं.ला शासनाकडून प्राप्त अनुदान, घरकर, इतर कर व फी याची रक्कम बँक खात्यात जमा असताना सचिवाने रेखांकित धनादेशाद्वारे अदा न करता स्वत:चे नावाने चेकद्वारे विड्रॉल करून दोन लाखावरील रक्कम सरपंच व सचिव यांनी संगनमताने खर्च केली. त्यामुळे सचिवाविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी स्थायी समितीत केली. याकडे लक्ष वेधत अध्यक्षांनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंत्यांना कारवाईचे निर्देश दिले. त्याचबरोबर हिंगणा आणि कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कराबाबत चुकीची माहिती खंडविकास अधिकाºयांनी सादर करून दिशाभूल केली होती. तसेच एलईडी लाईट खरेदीत झालेल्या भ्रष्टाचारात दोषी असलेले सचिव व सरपंच याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष सावरकर यांनी दिले. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती उकेश चव्हाण, आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, सदस्य विजय देशमुख, रूपराव शिंगणे, वर्षा धोपटे, ज्ञानेश्वर कंभाले, सीईओ संजय जादव, अति. सीईओ अंकुश केदार उपस्थित होते.