पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:17+5:302020-12-07T04:07:17+5:30

स्वत: जाळून आत्महत्या नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत इंदिरानगर, गल्ली नं. २ येथील रहिवासी प्रकाश बन्सीलाल कनोजिया (४४) यांनी ...

Filed a case against the husband who attacked his wife | पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Next

स्वत: जाळून आत्महत्या

नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत इंदिरानगर, गल्ली नं. २ येथील रहिवासी प्रकाश बन्सीलाल कनोजिया (४४) यांनी अंगावर स्वत: केरोसिन तेल ओतून जाळून घेतले. त्यांना उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक भोयर यांनी अकस्मात मृत्यूची नोंदणी केली आहे.

तरुणीची गळफास लावून आत्महत्या

नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत घाट रोड, विमल कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. २०२ येथील रहिवासी जान्हवी कांतीलाल पटेल (१८) या तरुणीने राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तिला उपचारासाठी प्रथम सेंट्रल पॉईंट हॉस्पिटलला नेण्यात आले आणि तेथून मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक कोल्हारे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विद्यापीठात उपस्थित इसमाचा अकस्मात मृत्यू

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कार्यालयात हजर असलेले दिलीप ईश्वर शिरसुदे (५६) यांचा अकस्मात मृत्यू झाला. ते जयभोले हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. ३७ येथील रहिवासी होते. कार्यालयात हजर असताना ते भोवळ येऊन खाली पडले. त्यांना उपचारासाठी दंदे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. घरी त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना मेडिकल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Filed a case against the husband who attacked his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.