जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:44+5:302021-07-07T04:09:44+5:30
माैदा : शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आराेपीविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या ...
माैदा : शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आराेपीविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर शिवारात रविवारी (दि.४) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
शंकर मद्रासी रा. इसापूर, ता. माैदा असे आराेपीचे नाव असून, अनुसया नत्थूजी डाेंगरे, रा. इसापूर, ता. माैदा असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. अनुसया डाेंगरे यांच्या शेतालगत आराेपीचे शेत आहे. तसेच डाेंगरे यांचे नातेवाईक शकुंतला शंकर डाेंगरे यांची शेती आराेपीने भाड्याने कसण्यासाठी घेतली असून, दाेघांच्या शेतीच्या मधात १०.६ फुटाचा धुरा आहे. त्या धुऱ्यावरून शेतीच्या वहिवाटीचा रस्ता आहे. दरम्यान आराेपी कसत असलेल्या शेतमालकाने गेट लावून रस्ता बंद केला हाेता. याबाबत तहसीलदारांच्या आदेशाने रस्त्याच्या ठिकाणी केलेले कुंपण व गेट जेसीबीच्या सहाय्याने फिर्यादीने ताेडले असता, आराेपी शंकर मद्रासी याने तेथे येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत ‘तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही, तुम्ही कुंपण गेट ताेडा, आम्ही बनवत जाऊ’ असे म्हणून फिर्यादीची पुतणी व मुलगा प्रकाश नत्थूजी डाेंगरे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अनुसया नत्थूजी डाेंगरे यांच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध कलम ३(१) आर, ३(१) एस अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९, भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान करीत आहेत.