गृह विलगीकरणाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:43+5:302021-03-09T04:08:43+5:30
मनपाचा इशारा : पाच हजारापर्यंत दंडही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस कोविड-१९ चा संसर्ग वाढत आहे. ...
मनपाचा इशारा : पाच हजारापर्यंत दंडही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस कोविड-१९ चा संसर्ग वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना त्यांच्या गृह विलगीकरणाची परवानगी दिलेली आहे. गृह विलगीकरणात असले तरी त्यांना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र गृह विलगीकरणमध्ये असलेले अनेक जण कोरोनाबाधित निकषाचे पालन करीत नाही. गरज नसताना घराबाहेर फिरत आहे. हा गंभीर प्रकार आहे. यामधून संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. १० दिवसाचे अनिवार्य विलगीकरणात ठेवून ५००० रु.पर्यंत दंड करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारण्याचे आदेश याआधीच निर्गमित करण्यात आले.
...
भरारी पथक गठित
मनपाने गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन होो की नाही, याची पडताळणी करण्यासाठी मनपा झोनस्तरावर भरारी पथक (फ्लाईंग स्क्वॉड) तयार करण्यात आलेले आहे. या पथकांना संबंधित रुग्ण जर घराबाहेर आढळून आला तर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी पोलीस यंत्रणेसोबतही समन्वय ठेवला जाणार आहे.