अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा : दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संघटना संतप्त

By Admin | Published: January 21, 2016 02:38 AM2016-01-21T02:38:07+5:302016-01-21T02:38:07+5:30

हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संपूर्ण देशात संतप्त पडसाद उमटत आहे.

Filing an Atrocities case: The organization is angry about the victim's suicide | अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा : दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संघटना संतप्त

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा : दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संघटना संतप्त

googlenewsNext

कुलगुरुंना बडतर्फ करा
नागपूर : हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी संपूर्ण देशात संतप्त पडसाद उमटत आहे. नागपुरतील आंबेडकरी संघटनांसह विविध पक्ष व संघटनांनीसुद्धा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत असून, याप्रकरणी हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी व राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. तसेच एका दलित विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे बुधवारी विद्यापीठ ग्रंथालयासमोर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर (कॅम्पस) येथे रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी जाहीर निषेध नोंदविण्यात आला. रोहितच्या आत्महत्येला मानव संसाधन विकास मंत्रालय, केंद्रीय विद्यापीठ हैदराबाद प्रशासन व कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्रात्रेय हे जबाबदार असून, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्याात आली. तसेच रोहितचे इतर चार मित्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात प्रमोद कुमार, मंगेश गडपायले, प्राची घोडेस्वार, नितीन फुके, मंगेश भैसारे, संदीप सूर्यवंशी आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे बुधवारी संविधान चौकात या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. कुलगुरू अप्पा राव, स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना बरखास्त करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते सिद्धार्थ पाटील, अहमद कादर, ईश्वर कडबे, हटवार दादा, राजेश बोरकर, विनोद पाटील, रमेश पाटील, शरद वंजारी, डॉ. विनोद रंगारी, बी.बी. खोब्रागडे आदी उपस्थित होते.
आंबेडकरी-बौद्ध संघटना
आंबेडकरी बौद्ध संघटनांच्यावतीने संविधान चौकात रोहित वेमुला याच्या आत्महत्याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तसेच रोहितला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक गोडघाटे, रणजित मेश्राम आदींसह आंबेडकरी-बौद्ध चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
जनता दल (सेक्युलर)
रोहित वेमुला या हुशार दलित विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे आरोपी हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि भारतीय विद्यार्थी परिषदेच्या हैदराबाद शाखेच्या विद्यार्थ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी जनता दल सेक्युलरचे नागपूर शहर महासचिव विजयकुमार खोब्रागडे यांनी केली. आरोपींना तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खोब्रागडे यांच्यासह शिवराज परपोटे, के.के. कदीर, सुरेश बागडे, जमील शेख, विनोद आत्राम, जगदीश भोगे, जयनुल चौधरी, वसंत डेकापूरवार, नितीन जामगडे आदींनी दिला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय व स्मृती इराणी यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच कुलगुरू अप्पा राव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे (पाटील), अनिल अहिरकर, बजरंगसिंह परिहार, प्रशांत बनकर, शैलेंद्र तिवारी, ईश्वर बाळबुधे, जावेद हबीब, पंकज ठाकरे, चरणजितसिंह चौधरी, जानबा मस्के, महेंद्र भांगे, वर्षा शामकुळे, आलोक पांडे, विनोद हेडाऊ आदी उपस्थित होते.
भीमशक्तीतर्फे आज निदर्शने
भीमशक्ती या संघटनेच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Filing an Atrocities case: The organization is angry about the victim's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.