आमदारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
By admin | Published: January 5, 2016 03:18 AM2016-01-05T03:18:59+5:302016-01-05T03:18:59+5:30
स्थानिक गडमंदिर परिसरातील राजकमल रिसॉर्टमध्ये धुडगूस घालत साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी रामटेक
रामटेक : स्थानिक गडमंदिर परिसरातील राजकमल रिसॉर्टमध्ये धुडगूस घालत साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आ. डी.एम. रेड्डी यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या रिसॉर्टमधील दारू व मांसाहार विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी रविवारी रिसॉर्टसमोर निदर्शने केली होती.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी नागपूर ते रामटेक मोटारसायकल रॅली काढली होती. या रॅलीचे रामटेक शहरात ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले. पुढे ही रॅली गडमंदिराच्या दिशेने निघाली. गडावर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. दरम्यान, आ. रेड्डी कार्यकर्त्यांसह गडमंदिर परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या राजकमल रिसॉर्टजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी ‘बार बंद करा, मांसाहार बंद करा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, रेड्डींनी कार्यकर्त्यांचे उद्बोधन केले. ‘हा धार्मिक परिसर आहे. येथे मांसाहार वर्ज्य असायला पाहिजे. दारू विक्रीसुद्धा बंद असायला पाहिजे’ अशी आग्रही भूमिका घेतली. आपण शासनाकडे या संबंधात पत्रव्यवहार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी रिसॉर्टमध्ये प्रवेश करीत खुर्च्या व कुंड्यांची फेकाफेक करायला सुरुवात केली. काहींनी मद्याच्या बाटल्या फोडल्या तर काहींनी स्वयंपाकगृहातील मांसाहाराची फेकाफेक केली.