मास्क न वापरणाऱ्यांवर फाैजदारी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:41+5:302021-09-27T04:09:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमणामुळे प्रशासनाने प्रत्येकाला मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मात्र, काही व्यक्ती मास्क न ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेराेना संक्रमणामुळे प्रशासनाने प्रत्येकाला मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मात्र, काही व्यक्ती मास्क न वापरता सर्वत्र वावरत असून, व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही बसतात. ही बाब लक्षात येताच काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिसांनी रविवारी (दि. २६) काेंढाळी परिसरातील ढाबे व हाॅटेलची पाहणी करीत मास्क न वापरणाऱ्या तीन ढाब्यांच्या मालकांवर फाैजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग काेंढाळी येथून गेला असून, २४ तास वर्दळीच्या या मार्गालगत काेंढाळी परिसरात हाॅटेल व ढाब्यांची संख्या बरीच माेठी आहे. या हाॅटेल व ढाब्यांवर प्रवासी व इतर नागरिकांचा सतत राबता असताे. यातील काही हाॅटेल व ढाबेमालक मास्कचा मुळीच वापर करीत नाही, अशा तक्रारीही पाेलिसांना प्राप्त झाल्या हाेत्या. त्याअनुषंगाने पाेलिसांनी हाॅटेल व ढाब्यांची पाहणी करायला सुरुवात केली.
या माेहिमेच्या पहिल्या दिवशी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पाेलिसांनी जुनापाणी (ता. काटाेल) शिवारातील हॉटेल बी. एस. ढाबा, खालसा ढाबा व स्वादानंद ढाब्याची पाहणी केली. यात त्यांनी मास्क न वापरणाऱ्या या तिन्ही ढाब्यांच्या मालकांवर फाैजदारी गुन्हे दखल केले. यात अनुक्रमे गुरमित बलदेव जौहाल (३२), अमरजितसिंग ज्योतीसिंग (३३) व जयंत सुदर्शन डोंगरे (२७) तिघेही रा. जुनापाणी, ता. काटाेल यांचा समावेश आहे.
या तिघांविरुद्ध भांदवि २६९ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी दिली. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस सहायक पोलीस निरीक्षक अजित कदम, उपनिरीक्षक राम ढगे, हेडकॉन्स्टेबल भोजराज तांदूळकर, पोलीस नायक संतोष राठोड, राजेश वासनकर यांच्या पथकाने केली.