मनपाचा वसुलीवर भर
By admin | Published: May 5, 2014 01:46 AM2014-05-05T01:46:38+5:302014-05-05T01:46:38+5:30
नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक रोज शहरातील विविध ठिकाणी कारवाई करून अतिक्रमण हटवितात. परंतु दुसºया दिवशी प्रत्येक ठिकाणी जैसे थे स्थिती दिसून येते.
विहंग सालगट
नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक रोज शहरातील विविध ठिकाणी कारवाई करून अतिक्रमण हटवितात. परंतु दुसºया दिवशी प्रत्येक ठिकाणी जैसे थे स्थिती दिसून येते. यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले असता, त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. मनपा अतिक्रमणाच्या नावाखाली केवळ कागदी कारवाई करून वसुली टार्गेट पूर्ण करीत असल्याचे दिसून आले. सध्या वर्धा मार्गावर अनेकांनी झाडाखाली आपली दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. शिवाय प्रत्येक आठवड्यातून दोनवेळा मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक येथे धडक देते. या उपरोक्त येथील अतिक्रमण मात्र जैसे थे आहे. गत सोमवारी दुपारी २ वाजता मनपाच्या धंतोली झोन येथील एका पथकाने (वाहन क्रमांक ३१/डब्ल्यू ५३०५) अशीच वर्धा मार्गावर धडक दिली.
पथकातील कर्मचारी वाहनातून खाली उतरताच सर्वत्र खळबळ माजली. सुरुवातीला मनपा कर्मचाºयांनी दुकानदारांवर चांगलाच दबाव टाकला; परंतु काहीच वेळात सर्वकाही शांत झाले. मनपाचे पथक कोणतीही कारवाई न करता तेथून निघून गेले. दरम्यान, मनपा कर्मचाºयांनी दुकानदाराशी तडजोड करून एक हजार रुपयांची पावती फाडली. जाता जाता एका कर्मचाºयाने फळाच्या दुकानातील द्राक्षाचा स्वादही घेतला. (प्रतिनिधी)
दंड भरा अतिक्रमण करा
यावेळी दुकानदार म्हणाला, त्याच्या गाडीत सुमारे २५ ते २६ हजार रुपयांचा माल होता. अशास्थितीत मनपाच्या पथकाने कारवाई केली असती तर त्याचे फार मोठे नुकसान झाले असते; सोबतच चालानही भरावे लागले असते. त्यामुळे एक हजार रुपये भरा आणि दुकानदारी करा, हा मध्यस्थ मार्ग असल्याचेही तो म्हणाला. रोज २० हजारांच्या वसुलीचे टार्गेट माहिती सूत्रानुसार,मनपाच्या अतिक्रमण विरोधी विभागात कारवाईसाठी तीन पथक तयार केले आहेत. यापैकी प्रत्येक पथकात १० कर्मचारी, चार ते पाच पोलीस कर्मचारी व दोन अभियंत्यांचा समावेश असतो. शिवाय प्रत्येक पथकासोबत एक ट्रक असतो. त्यात जप्ती केलेला माल भरल्या जातो. मनपाच्या या तिन्ही पथकांना रोज किमान २० हजार रुपयांच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करावे लागते.