अखेर मनपा स्थायी समितीच्या बैठकीचा अजेंडा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 08:42 PM2020-05-27T20:42:27+5:302020-05-27T20:43:51+5:30

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने स्थायी समितीची २० मे रोजीची बैठक मनपा प्रशासनाने रद्द केली होती. मात्र प्रशासनाकडून आयोजित विविध बैठकासाठी सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही का, मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम का, असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी उपस्थित केला होता. पदाधिकारी व प्रशासनातील वादामुळे समितीची बैठक कधी होणार याची उत्सुकता होती. अखेर १ जूनला बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Finally, the agenda of the meeting of the corporation standing committee was drawn up | अखेर मनपा स्थायी समितीच्या बैठकीचा अजेंडा काढला

अखेर मनपा स्थायी समितीच्या बैठकीचा अजेंडा काढला

Next
ठळक मुद्दे१ जूनला समितीची बैठक : सोशल डिस्टन्स ठेवून बैठक घेण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने स्थायी समितीची २० मे रोजीची बैठक मनपा प्रशासनाने रद्द केली होती. मात्र प्रशासनाकडून आयोजित विविध बैठकासाठी सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही का, मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम का, असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी उपस्थित केला होता. पदाधिकारी व प्रशासनातील वादामुळे समितीची बैठक कधी होणार याची उत्सुकता होती. अखेर १ जूनला बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबतचा अजेंडा निगम सचिवांनी बुधवारी काढला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा, शहरातील पाणीपुरवठा व अन्य अत्यावश्यक सेवा संदर्भात २० तारखेच्या बैठकीत चर्चा केली जाणार होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकात निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आयुक्तांच्या निर्देशानुसार मनपाच्या प्रभारी सचिव रंजना लाडे यांनी अध्यक्षांना बैठक रद्द करण्याबाबतचे पत्र दिले होते. यावर अध्यक्षांसह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
महापालिका मुख्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, कोविड-१९ संदर्भात बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांना उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांहून अधिक संख्या स्थायी समितीच्या बैठकीला राहात नाही. असे असतानाही बैठक रद्द करण्यात आल्याने वाद वाढला होता.
अखेर स्थायी समितीची बैठक १ जूनला आयोजित करण्यात आली आहे. यात अंबाझरी तलावातील मच्छिमारी बाबतच्या निविदा मंजुरी व अन्य विषयांचा अजेंड्यात समावेश आहे. या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पाणीपुरवठा यावरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Finally, the agenda of the meeting of the corporation standing committee was drawn up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.