अखेर भाजपाच्या संदीप गवईंची स्वप्नपूर्ती, चुरशीच्या लढतीत काँग्रेसवर मात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 08:45 PM2017-10-12T20:45:37+5:302017-10-12T20:45:47+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ (अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. विजयासाठी भाजपाच्या पदाधिका-यांनी शक्ती पणाला लावली.

Finally, BJP's Sandeep Gavai dream of completing dream, defeating Congress in Churashi | अखेर भाजपाच्या संदीप गवईंची स्वप्नपूर्ती, चुरशीच्या लढतीत काँग्रेसवर मात 

अखेर भाजपाच्या संदीप गवईंची स्वप्नपूर्ती, चुरशीच्या लढतीत काँग्रेसवर मात 

googlenewsNext

नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ (अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. विजयासाठी भाजपाच्या पदाधिका-यांनी शक्ती पणाला लावली. मात्र, मतदानाची टक्केवारी घटल्याने भाजपाची धाकधुक वाढली होती. अखेर काट्याच्या लढतीत भाजपाचे उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज भोरात यांचा ४६३ मतांंनी पराभव केला. गवई यांना ५७११ मते मिळाली तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली. 
गुरुवारी सकाळी १० वाजता सीताबडीं येथील  बचतभवन येथे मतमोजणी झाली.  मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यत काँग्रेसने चांगली टक्कर दिली. अखेर गवई विजयी झाल्याचे घोषित होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनामुळे  जागा रिक्त झाल्याने जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.  आठ उमेदवार मैदानात होते. भाजपाचाच उमेदवार विजयी होईल. असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला होता. दोन आठवड्यापासून या प्रभागात  जोरदार प्रचार मोहीम राबविली. तब्बल १२० कॉर्नर बैठका घेतल्या. मात्र २४.३३ टक्केच मतदान झाल्याने धाकधूक वाढली होती. काँँग्रेसकडूनही विजयाचा दावा केला जात असल्याने निवडणूक  निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  प्रभागातील  ५७,६९३ मतदारांपैकी १४,०३५ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला . यापैकी गवई यांना ५७११ तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली. बसपाच्या नंदा झोडापे यांना १६७५, अपक्ष गौतम कांबळे  यांना ६६८, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे सहदेव नारनवरे यांना १३०, अपक्ष  मनोज इंगळे  १४ ,वंदना जीवने ४२६,  तर  सुनील कवाडे यांना १५ मते मिळाली. १४७ मतदारांनी नोटाचा वापर केला. 

पाचव्या व सहाव्या फेरीने वाढविला गवईंचा बीपी 
मतमोजणीच्या पहिल्या चार फेरीत गवई यांनी थोरात यांच्यावर ७७७ मतांची आघाडी घेतली होती. मात्र पाचव्या व सहाव्या फेरीत थोरात यांना १४४६ तर गवई यांना ८८६ मते मिळाली. गवई यांचे मताधिक्य २१७ मतांवर आल्याने निकालाची उत्सुकता वाढली होती. सातव्या फेरीत पुन्हा गवर्इंनी थोरात यांच्यापेक्षा ५४ मते अधिक मिळाली. अखेरच्या फेरीत गवई यांना अधिक मते घेत विजय सुनिचित केला.

Web Title: Finally, BJP's Sandeep Gavai dream of completing dream, defeating Congress in Churashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.