अखेर मोक ाट कुत्र्यांवर होणार नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:17 AM2017-10-31T00:17:34+5:302017-10-31T00:18:07+5:30

मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Finally the dogs will be sterilized | अखेर मोक ाट कुत्र्यांवर होणार नसबंदी

अखेर मोक ाट कुत्र्यांवर होणार नसबंदी

Next
ठळक मुद्देमनपाचा दोन संस्थांशी करार : आठवडाभरात प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रात्रीला शहरात मोकाट कुत्र्यांची गस्त असते. यामुळे रात्री उशिरा कामावरून परतणाºयांत प्रचंड दहशत आहे. नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने कुत्र्यांची वाढणारी संख्या कशी रोखायची असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला होता. परंतु नसबंदीचा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे. यासाठी दोन संस्थांनी सहमती दर्शविली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. लोकमतने वेळोवेळी शहरातील मोकाट कुत्रे आणि जणावरांकडून नागरिकांना होणाºया त्रासाकडे लक्ष वेधले होते. हे विशेष.
सोसायटी फॉर प्रिव्हन्शन आॅफ क्रुरिटी अ‍ॅनिमल व बेस्ट फॉर अ‍ॅनिमल (सातारा) या दोन संस्थांवर नसबंदीची जबाबदारी सोपविली आहे. करारनामा व कामाचे स्वरूप निश्चित झाल्यानंतर आठवडाभरात नसबंदीच्या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. मोकाट कुत्र्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासन नसबंदीचा व्यापक कार्यक्रम राबविणार आहे.
ओळख पटण्यासाठी निशाणी
नागपूर शहरात ८० ते ९० हजार मोकाट कुत्रे आहेत. त्यामुळे नसबंदी केलेल्या कुत्र्यांची ओळख पटावी. यासाठी त्यांना निशाणी लावली जाणार आहे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांचा कान कापणे अथवा बिल्ला लावण्याचा विचार आहे. मात्र बिल्ला पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कापण्याचा विचार केला जात आहे.
शहरालगतच्या भागावर लक्ष
मोकाट कुत्र्यांची संख्या प्रामुख्याने शहरालगतच्या व मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे नसबंदी उपक्रमाला या भागातून सुरुवात करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मोक ाट कुत्र्यांची संख्या अधिक असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
कुत्र्यांची गणना
साधारणपणे नागरी लोकसंख्येच्या तुलनेत मोकाट कुत्र्यांची संख्या तीन टक्के असते. कुत्र्यांची प्रभागनिहाय गणना करताना प्रभागातील लोकसंख्या व कुत्र्यांची संख्या याची सरासरी संकलित केली जात आहे. यापूर्वी नसबंदी करण्यात आलेल्या, नसबंदी न झालेल्या कुत्र्यांचा डाटा तयार करणार आहे. सोबतच कुत्र्यांची लहान पिले व गर्भधारणा झालेल्या कुत्र्यांचीही माहिती संकलित केली जाणार आहे. कोल्हापूर येथील व्हीटीएस फॉर अ‍ॅनिमल संस्थेवर गणनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आठवडाभरात नसबंदीचा उपक्रम
शहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी प्रभागनिहाय डाटा संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच आठवडाभरात नसबंदीचा उपक्रम राबविला जाणार आहे. ही जबाबदारी दोन संस्थांवर सोपविण्यात आली आहे.
- डॉ. गजेंद्र महल्ले, पशुचिकि त्सक महापालिका

Web Title: Finally the dogs will be sterilized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.