अखेर ‘फिरोझा बी’ला मिळाला मुलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:00+5:302021-06-03T04:08:00+5:30

कोंढाळी : कौटुंबिक वादानंतर घरातून काढण्यात आलेल्या ‘फिरोझा बी’ला मंगळवारी तिच्या मुलासह नातेवाईकांनी जवळ केले. या महिलेचा शोध घेताना ...

Finally, Firoza B got the support of a child | अखेर ‘फिरोझा बी’ला मिळाला मुलाचा आधार

अखेर ‘फिरोझा बी’ला मिळाला मुलाचा आधार

Next

कोंढाळी : कौटुंबिक वादानंतर घरातून काढण्यात आलेल्या ‘फिरोझा बी’ला मंगळवारी तिच्या मुलासह नातेवाईकांनी जवळ केले. या महिलेचा शोध घेताना सर्वत्र भटकंती करणाऱ्या नातेवाईकांनी लोकमतच्या बातमीचा आधार घेत मंगळवारी कोंढाळी गाठले. लोकमतने मंगळवारच्या अंकात ‘या निराधार महिलेला मिळेल का आधार?’ यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. तीत गत दोन महिन्यांपासून कोंढाळी नजीकच्या दुधाळा येथील एसटीच्या प्रवासी निवाऱ्यात मुक्कामी असलेल्या फिरोझा बी मोहम्मद अनवर (५०) अंसारनगर, वडगाव रोड, अमरावती या महिलेची व्यथा समाजापुढे मांडली होती. या महिलेचे पती मोहम्मद अनवर पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून घरून निघून गेले. ते परत आलेच नाहीत. १० वी पर्यंत शिकलेल्या ‘फिरोझा बी’ यांनी शिवणकाम करुन फिरोज व जावेद या दोन मुलांचे पालनपोषण करुन लग्न करून दिले. ‘फिरोझा बी’ चा मोठा मुलगा फिरोज याला दारूचे व्यसन आहे. फिरोजने आई व लहान विवाहित भाऊ जावेद यांना मारहाण करून घरून हकलून दिले होते. घर दुसऱ्याला भाड्याने दिले. फिरोज व जावेद हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने राहत होते तर फिरोझा बी भटकत होत्या. काही महिन्यापूर्वी त्या भटकत भटकत पायी कोंढाळी येथे पोहोचल्या. ‘फिरोझा बी’ अमरावतीला दिसल्या नाही तेव्हा बडेनेरा येथे राहणाऱ्या त्यांच्या वृद्ध आई-वडील व अचलपूर येथील भावाने त्यांचा शोध सुरु केला. अमरावती येथील नागपूर गेट पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार चार महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. अमरावती पोलीस व नातेवाईकांनी परतवाडा, अकोला, यवतमाळ आदी ठिकाणी शोध घेतला पण त्यांचा शोध लागत नव्हता. मात्र लोकमतने ‘फिरोझा बी’ ची व्यथा समाजापुढे मांडली. काटोल येथील मिलिंद देशमुख, प्रहारचे दिनेश निंबाळकर,कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार, भाजपचे प्रमोद चाफले, सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख यांच्यासह अनेकांनी ‘फिरोझा बी’ला मदत करण्यासाठी हात समोर केला.

असे कळले नातेवाईकांना

कोंढाळी येथील रियाज शेख व अफसर हुसैन यांनी लोकमतची बातमी विदर्भातील मुस्लीम समाजाच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर टाकली. या बातमीने ‘फिरोझा बी’ कोंढाळीला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना समजले. अमरावती येथून एका ऑटो रिक्षात ‘फिरोझा बी’चा लहान मुलगा जावेद, त्यांचा भाऊ जमीर भाई आदी मंगळवारी रात्री ८ वाजता कोंढाळीला पोहोचले.

- दुधाळा येथील पोलीस रियाज शेख,अफसर हुसैन, पोलीस पाटील बंडू रेवतकर आदीसह ‘फिरोझा बी’ ची भेट घेतली. यानंतर ते कोंढाळी पोलीस ठाण्यात आले. ‘फिरोझा बी’ चे आधार कार्ड व ओळखपत्र दाखवून आईला अमरावती येथे नेत असल्याची माहिती दिली. कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार,पोलीस उपनिरीक्षक देवेद्र सोनावले यांनी ‘फिरोझा बी’चे बयाण नोंदवून व मुलाकडून त्यांची योग्य प्रकारे देखरेख करण्याचे हमीपत्र घेतले. यासोबतच ठाणेदार विश्वास फुल्लरवार व रियाज शेख यांनी आर्थिक मदत करून फिरोझा बी ला अमरावती येथे रवाना केले.

Web Title: Finally, Firoza B got the support of a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.