अखेर विधान परिषदेत दखल

By admin | Published: December 23, 2015 03:33 AM2015-12-23T03:33:40+5:302015-12-23T03:33:40+5:30

मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नातसुनेच्या ....

Finally intervene in the Legislative Council | अखेर विधान परिषदेत दखल

अखेर विधान परिषदेत दखल

Next

अण्णाभाऊ साठेंच्या नातसुनेची न्यायासाठी भटकंती : सरकारला निवेदन करण्याची सूचना
नागपूर : मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नातसुनेच्या भटकंतीच्या लोकमतच्या वृत्ताचे विधिमंडळात पडसाद उमटले. लोकमतच्या वृत्ताचा हवाला देऊन आमदारांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे विधान परिषदेत सभापतींनी सरकारला निवेदन करण्याची सूचना केली.
अण्णाभाऊंची पणनात सुवर्णा अशोक साठे ही पोलीस दलात कार्यरत होती. तिचे अपहरण करून तिला जाळून ठार मारल्याचा आरोप असलेली तक्रार सुवर्णाच्या आई लीलाबाई साठे यांनी कासेगाव पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्यात आले. त्याचा धसका बसल्याने सुवर्णाचे वडील (अण्णाभाऊंचे नातू) अशोक साठे यांचाही मृत्यू झाला. लागोपाठ मुलगी आणि पती गमावणाऱ्या लीलाबाई न्याय मिळवण्यासाठी आठ महिन्यांपासून भटकंती करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्या सोमवारी नागपुरात आल्या. साठे कुटुंबियांची कैफियत लोकमतने मंगळवारच्या अंकात प्रकाशित केली.

Web Title: Finally intervene in the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.