अखेर खडसे झोटिंग समितीसमोर हजर

By admin | Published: February 15, 2017 03:11 AM2017-02-15T03:11:00+5:302017-02-15T03:11:00+5:30

भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.

Finally Khadse appeared before the Joting Committee | अखेर खडसे झोटिंग समितीसमोर हजर

अखेर खडसे झोटिंग समितीसमोर हजर

Next

पाऊण तास मांडली बाजू :
२१ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी
नागपूर : भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. ‘अ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफिडेव्हिट’ दाखल केले. या प्रतिज्ञापत्रावर आता सुनावणी होणार आहे. यावर समितीने २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन पदाचा दुरुपयोग करून नातेवाईकांना दिल्याचा आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटिंग यांची एक सदस्यीय समिती गठित केली. नागपुरातील रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मधून झोटिंग चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. गेल्या सात महिन्यापासून ही समिती चौकशी करीत आहे. यादरम्यान समितीने औद्योगिक विभाग आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्यासाठी

( पान १ वरुन)
बोलावण्यात आले होते. दोन्ही विभागाच्या प्रधान सचिवांनीही समितीसमोर हजेरी लावली होती. या चौकशीला होत असलेल्या दिरंगाईवर मुंबई उच्च न्यायालयाने सुुद्धा नाराजी व्यक्त करीत शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, समितीकडून आता उलटतपासणी सुरू करण्यात आली आहे. खडसे, महसूल आणि औद्योगिक विभागाकडून आपापला युक्तिवाद वकिलामार्फत समितीसमोर ठेवण्यात येत आहे.
याप्रकरणी खडसेंना उलटतपासणीसाठी नोटीस बजावली असून, समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आजवर त्यांनी वकिलांमार्फत बाजू मांडल्याने ते स्वत: हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मंगळवारी दुपारी १२ वाजता एकनाथ खडसे हे त्यांचे वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. अमोल पाटील यांच्यासह न्या. झोटिंग समितीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल पाऊण तास त्यांनी आपली बाजू मांडली. १२.४० मिनिटांनी ते समितीच्या कार्यालयातून बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांनी आपल्या साक्षी पुराव्याचे अ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफिडेव्हिट सादर केले.
यावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २१ तारखेलाही एकनाथ खडसे स्वत: उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Finally Khadse appeared before the Joting Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.