अखेर नागरिकांनीच बुजवले रस्त्यावरचे खड्डे, सिनिअर सिटीझन्स फोरमचा पुढाकार
By आनंद डेकाटे | Published: July 29, 2023 03:27 PM2023-07-29T15:27:31+5:302023-07-29T15:27:57+5:30
अनोख्या आंदोलनातून वेधले प्रशासनाचे लक्ष
नागपूर : शहरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये जा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर नागपुरातील अशाच रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मनपा आयुक्तांना उत्तर नागपूर सिनियर सिटीझन फोरमच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु पंधरा दिवसांनंतरही काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे शेवटी उत्तर नागपुरातील नागरिकांनी लाल गोदाम जवळचा खड्डे बुजवा आंदोलन केले. यात नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
उत्तर नागपूरच्या समस्यांनी त्रस्त नागरिक आता स्वतःच रस्त्यावर आले आहेत. तेव्हा प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात उत्तर नागपूर सिनियर सिटीझन फोरमचे अशोक गजभिये, अचल रामटेके, मिलिंद भगत, अजय गौतम, रमेश पाटील, वसंत संभरकर,पंचम गायकवाड, दीक्षित आवळे, नरेश कोटांगळे, नरेश साखरे, नरेश उके, अतुल खोब्रागडे, प्रशांत बेले, मयुरी माटे, सोनू बहाडे, मंगेश नागदेवे, अशोक भेलावे, चाहत सरदारे यांनी केली.