अखेरीस विदर्भात बरसल्या जलधारा; शेतकरीवर्ग सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:04 AM2021-07-08T10:04:54+5:302021-07-08T11:58:20+5:30
Nagpur News संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नागपूर व विदर्भात पावसाला सुरूवात झाली. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नागपूर व विदर्भात पावसाला सुरूवात झाली. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या पावसाने धानाच्या पºह्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रात्रभरापासून सुरू असलेल्या व सौम्य स्वरुपात कोसळणाºया पावसाने नंतर पहाटे तीव्र रूप धारण केले. नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.उन्ह चांगले तापत असल्याने कोवळी पिके माना टाकत असल्याने शेतकरी घायकुली आला होता. पण बुधवारला विजेच्या कठाक्यात आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अमृतधारा बरल्याने शेतकरी आनंदून गेला. पिकांना संजिवनी मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले असून सकाळी थांबलेला पावसाने परत सुरूवात केली आहे.
दोन आठवड्यापासून पावसाने उघाड दिली होती. सेवाग्राम आणि परिसरातील शेतकरी नव्हे तर नागरिकही असह्य उन्ह आणि गर्मीमुळे त्रस्त झाले होते.घामाच्या धारा वाहत असल्याने पावसाकडे लक्ष लागले होते. पाऊस पडावा यासाठी देवाला साकडे घालण्यात आले. डी धोंडी पाणी दे असेही म्हणत काही गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. सर्वांचेच लक्ष आभाळाकडे लागले होते.शेतकऱ्यांनी तर दुबार पेरणी करावी लागणार याची चिंता लागली होती. यातून आर्थिक घडी नक्कीच विस्कटविणारी होती.
नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. सकाळी साडेसात वाजतापासून नागपुरात आलेला पाऊस नऊ वाजेपर्यंत सुरू होता त्यानंतरही पावसाची उघडीप सुरूच आहे. शहराच्या अनेक भागात रिमझिम पाऊस येत आहे. नागपूर ग्रामीणमध्ये सर्व तालुक्यात पाऊस पडला, यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचा आनंद शेतकऱ्यांना आहे.
मागील 24 तासात गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. गोंदिया जिल्ह्यात 48 मिलिमीटर तर वर्धा जिल्ह्यात 23 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. यासोबतच नागपूर जिल्ह्यातही गुरुवारी सकाळपर्यंत 10.5 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.