नागपूर मनपावर ग्रीनबसचा आर्थिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:50 AM2018-03-23T00:50:54+5:302018-03-23T00:51:06+5:30

महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द्यावा लागतो. तसेच भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नाही, यामुळे बससेवा तोट्यात चालवावी लागत आहे. भविष्यात ५५ बसेस चालविल्यास तोटा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे.

Financial burden of Greenbus on Nagpur NMC | नागपूर मनपावर ग्रीनबसचा आर्थिक भार

नागपूर मनपावर ग्रीनबसचा आर्थिक भार

Next
ठळक मुद्देबसेस वाढल्यास तोटाही वाढणार : परिवहन विभागाची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द्यावा लागतो. तसेच भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नाही, यामुळे बससेवा तोट्यात चालवावी लागत आहे. भविष्यात ५५ बसेस चालविल्यास तोटा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे.
फेब्रुवारी २०१७ पासून जानेवारी २०१८ पर्यंत ग्रीनबस पासून महापालिकेला ७३ लाख ९९ हजार ८८७ रुपयाचा महसूल मिळाला. बस आॅपरेटरला १ कोटी २१ लाख ६ हजार ४४८ रुपये मोबदला म्हणून द्यावा लागला. म्हणजेच महापालिकेला ४७ लाख ६ हजार ५६१ रुपयांचा तोटा झाला. पुन्हा नवीन २५ ग्रीनबसची यात भर पडल्यास हा तोटा दुप्पट होण्याची शक्यता आहे. सध्या या बसेस हिंगणा, डिफेन्स,कन्हान, बुटीबोरी, मिहान, बेसा, पिंपळफाटा, बहादुराफाटा आदी मार्गावर धावतात. या बसचे भाडे प्रति २ किलोमीटरला १४ रुपये आकारले जाते. रेडबसच्या तुलनेत ग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने ग्रीनबस रिकाम्या धावतात. यामुळे ग्रीन बस भाड्यात कपात करून प्रति २ किलोमीटरला १२ रुपये करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे.
विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा प्रस्ताव
ग्रीन बसला प्रवासी मिळत नसल्याने शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना बस भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे. याबसमध्ये प्रवासी भाड्यात सवलत दिल्यास ग्रीन बसला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Financial burden of Greenbus on Nagpur NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.