‘मॅसेज, लिंक’द्वारे आर्थिक फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:12 AM2021-08-20T04:12:35+5:302021-08-20T04:12:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : डिजिटल युगात माेबाईल फाेनवर विशिष्ट मॅसेज व लिंक पाठवून त्या क्लिक करण्याची सूचना केली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : डिजिटल युगात माेबाईल फाेनवर विशिष्ट मॅसेज व लिंक पाठवून त्या क्लिक करण्याची सूचना केली जाते. असले मॅसेज व लिंक धाेकादायक असून, त्याच्या माध्यामातून सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने या मॅसेज व लिंक तसेच सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे, असे आवाहन खापा पाेलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहायक पाेलीस निरीक्षक अजय मानकर यांनी केले आहे.
सायबर चाेरट्यांकडून ‘तुम्हाला लॉटरी लागली आहे, बक्षीस मिळविण्यासाठी काही रक्कम भरा, यासह इतर आमिषे दाखविली जाते किंवा व्हाॅट्सॲप मॅसेज, एसएमएस पाेस्ट केले जातात अथवा मेल पाठविले जातात. त्या मॅसेज अथवा लिंक क्लिक केल्यानंतर मेल उघडा, बँक खाते किंवा एटीएम कार्डबाबत गाेपनीय माहिती विचारली जाते. पैशाचा माेह अनावर हाेत असल्याने नागरिकही चाेरट्यांना गाेपनीय माहिती देतात. त्या माहितीच्या आधारे बँक खात्यातून रकमेची परस्पर उचल करून फसवणूक केली जाते, असेही अजय मानकर यांनी सांगितले.
ही फसवणूक टाळण्यासाठी असल्या आमिषांवर विश्वास ठेवून त्याला बळी पडू नका, आपले बँक खाते, एटीएम व क्रेडिट कार्ड क्रमांक, त्यांचे पिन नंबर यासह अन्य गाेपनीय माहिती कधीही अनाेळखी व्यक्तीला प्रत्यक्ष अथवा फाेनवर सांगू नका. प्रत्येकाने ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन ठाणेदार अजय मानकर यांनी केले आहे.
190821\img_20201218_184219.jpg
फसवे मॅसेज कींवा मेल आल्यास सावधगिरी बाळगा... खापा ठाणेदार अजय मानकर यांनी केले नागरीकांना आव्हान