व्यवस्थापकाने केला आर्थिक गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:52+5:302020-12-29T04:08:52+5:30

माैदा : कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकाने १ लाख १५ हजार ३०५ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ...

Financial malpractice committed by the manager | व्यवस्थापकाने केला आर्थिक गैरव्यवहार

व्यवस्थापकाने केला आर्थिक गैरव्यवहार

Next

माैदा : कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकाने १ लाख १५ हजार ३०५ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आले असून, गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

ए. फकउद्दीन (रा. एमआयडीसी काॅलनी, बुटीबाेरी) असे त्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ते वैनगंगा एक्स्प्रेस वे प्रा. लि. नामक कंपनीमध्ये व्यवस्थापकपदी कार्यरत हाेते. त्यांनी आर्थिक व्यवहारात कमी अधिक केल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली हाेती. या प्रकरणाची बारकाईने चाैकशी केली असता, त्यांनी कंपनीची १ लाख रुपये राेख, ५२ हजार ८०५ रुपयांचा लॅपटाॅप व ५०० रुपयांचा पंखा असा एकूण १ लाख ५३ हजार ३०५ रुपयांचा घाेळ केल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रकरण पाेलिसात गेले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी एम. रवींद्र यांच्या तक्रारीवरून भादंवि ३८१ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. वृत्त लिहिस्ताे आराेपीस अटक करण्यात आली नव्हती. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार कुथे करीत आहेत.

Web Title: Financial malpractice committed by the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.