अतिक्रमणावर उपाय शोधा

By admin | Published: January 8, 2015 01:22 AM2015-01-08T01:22:22+5:302015-01-08T01:22:22+5:30

भंडारा रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्याची मौखिक सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना केली.

Find solutions for encroachment | अतिक्रमणावर उपाय शोधा

अतिक्रमणावर उपाय शोधा

Next

तिढा भंडारा रोडचा : पोलीस आयुक्तांना हायकोर्टाच्या सूचना
नागपूर : भंडारा रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्याची मौखिक सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना केली.
भंडारा रोडवरील अव्यवस्थेसंदर्भात अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती कागदावरच आहे. अतिक्रमणाची समस्या कायमची निकाली काढण्यात अद्यापही यश आलेले नाही. रोडवर नियमित बाजार भरतो. फेरीवाले उभे राहतात. दोन्ही बाजूच्या फुटपाथवर मेकॅनिक्सचा ताबा आहे, असे न्यायालयाला सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने समस्याग्रस्त भागात अकस्मात जाणे, नियमित पेट्रोलिंग करणे असे उपाय करता येतील असे सुचविले. तसेच, पोलीस विभाग व महानगरपालिकेला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, तर मध्यस्थातर्फे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Find solutions for encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.