वेस्टमध्ये व्हॅल्यू शोधा ; केंद्रीय मंत्री गडकरींचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:52 AM2018-11-04T00:52:38+5:302018-11-04T00:53:22+5:30

मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला कचरा याचे मूल्यवर्धन करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे नवीन संशोधकांना, स्टार्टअपनी शेती, कचरा, जंगल, बांबू यावर संशोधन करून, त्याची व्हॅल्यू वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूजल व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Find the value in the west; Union Minister Gadkari appeals | वेस्टमध्ये व्हॅल्यू शोधा ; केंद्रीय मंत्री गडकरींचे आवाहन

वेस्टमध्ये व्हॅल्यू शोधा ; केंद्रीय मंत्री गडकरींचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देस्टार्टअपचा ग्रॅण्ड फिनाले समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला कचरा याचे मूल्यवर्धन करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे नवीन संशोधकांना, स्टार्टअपनी शेती, कचरा, जंगल, बांबू यावर संशोधन करून, त्याची व्हॅल्यू वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूजल व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि कौशल्यविकास मंत्रालयाच्या वतीने राज्यात स्टार्टअप यात्रा काढण्यात आली होती. याचा ग्रॅण्ड फिनाले विश्वश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ऊर्जा व पालकमंत्री चंद्रश्ेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव असिम गुप्ता, व्हीएनआयटीचे चेअरमन विश्राम जामदार व व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे उपस्थित होते. ३ आॅक्टोबर रोजी मुंबई येथून स्टार्टअप यात्रेला सुरुवात झाली. राज्यातील १४ जिल्ह्यात स्टार्टअपच्या कार्यशाळा झाल्या. यातून ३१० स्टार्टअप निवडण्यात आले. ग्रॅण्ड फिनालेमध्ये यातून १९ स्टार्टअपला पुरस्कृत करण्यात आले. ग्रॅण्ड फिनालेतून निवडण्यात आलेल्या १९ स्टार्टअपना नितीन गडकरी यांच्याहस्ते पुरस्कृत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रसंगी विश्राम जामदार म्हणाले की, व्हीएनआयटीमध्ये इंटरप्रेन्युअरचा स्वतंत्र विभाग आहे. व्हीएनआयटीमध्ये प्लेसमेंट सुद्धा चांगल्या होतात. पण चांगल्या इन्स्टिट्यूटचा मापदंड हा जास्त प्लेसमेंट पेक्षा उद्योजक किती घडविले असा असला पाहिजे. यावेळी असिम गुप्ता म्हणाले की, तरुणांमध्ये भन्नाट आयडिया आहेत. पण त्या प्र्रोडक्टमध्ये कर्न्व्हट करता आल्या पाहिजे. तेव्हाच मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होईल. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
 अभिनंदन पाटील ठरला स्टार्टअप हिरो आॅफ द स्टेट
स्टार्टअप ग्रॅण्ड फिनालेमध्ये उत्कृष्ट आयडिया मांडणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात स्टार्टअप हिरो आॅफ द स्टेटचा पुरस्कार कोल्हापूरच्या अभिनंदन पाटील यांनी पटकाविला. तर टॉप वूमन इंटरप्रेन्युअरचा पुरस्कार प्रियंका सरवदे, पूजा भलमीकर व मयुरी सावंत यांनी पटकाविला. त्याचबरोबर विविध गटामध्ये अर्जुन देवरणकर, मुकेश बिसेन, सुरेंद्र काळबांडे, दीपक सावंत, प्रियंका पाटील, हंसराज पारधी, डॉ. वैशाली कुळकर्णी, निकेश इंगळे, वैभव माधेकर, स्वागता कावळे, मधुरा राठी, योगेश भंडारी, आशिष चांदवलकर, अमित माहोरे, मिथिलेश हिंगे यांना पुरस्कृत करण्यात आले.

 

Web Title: Find the value in the west; Union Minister Gadkari appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.