स्वस्त धान्य दुकानदारावर ठाेठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:18+5:302021-05-16T04:08:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : काेराेना संक्रमण टाळण्यासाठी शासनाने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. याचे उल्लंघन केल्यास ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : काेराेना संक्रमण टाळण्यासाठी शासनाने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. खापरखेडा (ता. सावनेर) येथील मयुरी स्वस्त धान्य दुकानासमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन हाेत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने दुकानदारावर दंडात्मक कारवाई करीत ५०० रुपयांचा दंड ठाेठावला.
ते दुकान सुरेश रामटेके यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या दुकानासमाेर गुरुवारी (दि. १३) सकाळी १० वाजताच्या सुमारास लाभार्थ्यांनी धान्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली हाेती. लाभार्थी जवळजवळ उभे हाेते, तर दुकानासमाेर लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर गाेल अथवा चाैकाेनही तयार केले नव्हते. शिवाय, नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन करावे, यासाठी दुकानदाराने कर्मचाऱ्याची नियुक्तीदेखील केली नव्हती. हे दुकान मुख्य मार्गालगत असल्याने दुकानासमाेरील लाभार्थी बाजारात ये-जा करणाऱ्या ग्राहकांच्या थेट संपर्कात येत हाेते.
ही बाब काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी यासंदर्भात पोलीस ठाणे, ग्रामपंचायत व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार केली. या तक्रारीची वेळीच दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने सुरेश रामटेके यांच्यावर ५०० रुपयांचा दंड ठाेठावला. या कारवाईमुळे इतर दुकानदारांना धडा मिळणार असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
...
दाेन हजार रुपयांची तरतूद
फिजिकल डिस्टन्सिंगबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी १७ एप्रिल २०२० राेजी एक आदेश जारी केला हाेता. फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती २०० रुपये आणि दुकानदाराने ग्राहकांना उभे राहण्यासाठी त्याच्या दुकानासमाेर तीन फूट अंतरावर मार्किंग न केल्यास दाेन हजार रुपयांच्या दंडाची तसेच दुकानदारावर फाैजदारी गुन्हा नाेंदविण्याची तरतूद या आदेशात केली आहे. हा आदेश लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने ठाेठावलेल्या दंडाची रक्कम कमी असल्याची माहिती शेखर काेलते यांनी दिली.