१० हजार रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:14 AM2021-02-21T04:14:59+5:302021-02-21T04:14:59+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमित रुग्णांंमध्ये हळूहळू वाढ हाेत असतानाच तहसील प्रशासनाने उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ...

A fine of Rs 10,000 was recovered | १० हजार रुपयांचा दंड वसूल

१० हजार रुपयांचा दंड वसूल

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमित रुग्णांंमध्ये हळूहळू वाढ हाेत असतानाच तहसील प्रशासनाने उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. प्रशासनाने शनिवारी (दि. २०) मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.

रामटेक शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह अन्य बाबी करायला सुरुवात केली. नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडला असून, पुन्हा रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. वारंवार सूचना देऊन, तसेच आवाहन करूनही नागरिक उपाययाेजनांचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात येताच तहसील प्रशासनाने पाेलीस व नगर परिषद प्रशासनाच्या मदतीने उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली.

दरम्यान, या पथकाने शनिवारी रामटेक शहरात मास्क न वापरता राेडवर फिरणाऱ्या २० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही माेहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. शिवाय, काेराेना संक्रमण कायमचे दूर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांच्यासह अधिकाऱ्यांनी केले आहे. या माेहिमेत पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, नगरपरिषदेचे अधिकारी राजेश सव्वालाखे, गणेश अंदुरे, मनोज बागडे, रोहित भोईर, अभिषेक अंबागडे, प्रकाश बर्वे सहभागी झाले होते.

Web Title: A fine of Rs 10,000 was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.