१५ हजार रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:11+5:302021-04-23T04:09:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे असे आवाहन ठाणेदार हेमंतकुमार खराबे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे असे आवाहन ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी केले आहे. त्यातच या उपाययाेजनांची पायमल्ली करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने राज्यात रात्री ८ वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी, तर सकाळी ८ वाजतापासून रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतचा वेळ वैद्यकीय सेवा वगळता अन्य अत्यावश्यक सेवा व वस्तूंच्या विक्रीसाठी देण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वांनी पालन करणे सक्तीचे असून, उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाय, पाेलीस प्रशासनाच्यावतीने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना आणि लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे, असेही हेमंतकुमार खराबे यांनी सांगितले.
दरम्यान, या उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या सहा जणांवर एकूण तीन हजार रुपये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व गर्दी करणाऱ्या ५० जणांवर १० हजार रुपये, एका हाॅटेल मालकावर १,५०० रुपये, तसेच वाहतुकीदरम्यान काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्या एकावर ५०० रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला असून, या सर्वांकडून एकूण १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही माेहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी स्पष्ट केले.