फुकट्या प्रवाशांकडून १६,५४५ रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:10+5:302021-06-10T04:07:10+5:30

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक विकास कुमार आणि सहायक मंडळ वाणिज्य प्रबंधक ...

A fine of Rs 16,545 was levied on free passengers | फुकट्या प्रवाशांकडून १६,५४५ रुपये दंड वसूल

फुकट्या प्रवाशांकडून १६,५४५ रुपये दंड वसूल

Next

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक विकास कुमार आणि सहायक मंडळ वाणिज्य प्रबंधक अविनाश कुमार आनंद यांच्या नेतृत्वात बुधवारी तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी नागपूर-तुमसर राेड रेलमार्गाने जाणाऱ्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान राबविले. या कारवाईत विना तिकीट प्रवास करणाऱ्या ३० लाेकांवर गुन्हे दाखल करून १६,५४५ रुपये दंड वसूल केला. याशिवाय मास्क न वापरणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली. या अभियानादरम्यान अविनाशकुमार आनंद यांनी तुमसर राेड स्टेशनचे पीआरएस ऑफिसचे आकस्मिक निरीक्षण केले. यावेळी विजय कन्हैयालाल नामक व्यक्ती रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करताना आढळून आला. त्याच्याकडून एक माेबाईल व दाेन तिकिटांसह ३००० रुपये राेख वसूल करण्यात आले. त्याला आरपीएफच्या स्वाधीन करण्यात आले. मंडळ रेल्वे प्रबंधक मनिंदर उप्पल यांनी सर्व रेल्वे प्रवाशांना काेराेना नियंत्रण नियमांचे पालन करण्याचे आणि याेग्य तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले. नियम माेडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: A fine of Rs 16,545 was levied on free passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.