१७,५०० रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:47+5:302021-03-01T04:09:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययाेजनांसाेबतच शनिवार (दि. २७) व रविववारी (दि. २८) ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययाेजनांसाेबतच शनिवार (दि. २७) व रविववारी (दि. २८) बंदचे आवाहन केले हाेते. मात्र, काही नागरिक उपाययाेजनांचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नगर परिषद, महसूल, आराेग्य व पाेलीस विभागाच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली. या पथकाने रविवारी नरखेड शहरात ७५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण १७,५०० रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती नगर पालिका प्रशासनाने दिली.
दंडात्मक कारवाई करणाऱ्यांमध्ये विना मास्क फिरणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या नागरिकांसह काही दुकानदार व व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नरखेड शहरात विशेष बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीला नगराध्यक्ष अभिजित गुप्ता, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दत्तात्रय वनकडस, पालिकेचे मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
जे नागरिक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नगर परिषद, महसूल, आराेग्य व पाेलीस विभागातील कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके तयार केली असून, त्यांना उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या पथकाने नरखेड शहरातील मुख्य बाजारपेठे, चौक व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करीत नागरिकांंनी तपासणी केली आणि उल्लंघन करणाऱ्या ७५ नागरिकांवर दंड ठाेठावत त्यांच्याकडून १७,५०० रुपयांचा दंड वसूल केला. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
....
सुपर स्प्रेडरने टेस्ट करावी
काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरासह ग्रामीण भागातील व्यापारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेते, खासगी डॉक्टर, मेडिकल स्टोर्सचे मालक व अन्य दुकानदारांनी स्वतः व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करावे. सुपर स्प्रेडर व्यक्तींनी कोरोना टेस्ट करून घ्यावी. खासगी डाॅक्टरांनी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णास प्राथमिक उपचार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी बाध्य करावे. सामान्यपणे अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास मेडिकल स्टाेर्समधून स्वत: औषधी खरेदी करून न खाता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा व्यक्तींना मेडिकल स्टाेर्स मालकांची औषधी देऊ नये, असे आवाहन डाॅ. दत्तात्रय वनकडस यांनी केले.