३८ हजार रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:54+5:302021-03-22T04:08:54+5:30
रेवराल : काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्यात एकीकडे नागरिक हयगय करीत असून, दुसरीकडे प्रशासनाने हयगय करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी ...
रेवराल : काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्यात एकीकडे नागरिक हयगय करीत असून, दुसरीकडे प्रशासनाने हयगय करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. माैदा शहरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या या माेहिमेंतर्गत १३७ नागरिकांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडून ३७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती माैद्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. ही माेहीम जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या माेहिमेंतर्गत मास्क न वापरणाऱ्या ३५ जणांकडून १३,६०० रुपये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या १०२ जणांकडून २४,३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या माेहिमेत ठाणेदार हेमंतकुमार खराबे, सहायक पाेलीस निरीक्षक जाधव, उपनिरीक्षक मोहोळ यांच्यासह महसूल विभागाचे व नगर पंचायत कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले हाेते.