४० हजार रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:44+5:302021-03-26T04:10:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : परिसरात काेराेनाग्रस्तांची संख्या वाढत असताना, स्थानिक ग्रामपंचायत व खापरखेडा पाेलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : परिसरात काेराेनाग्रस्तांची संख्या वाढत असताना, स्थानिक ग्रामपंचायत व खापरखेडा पाेलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या माेहिमेंतर्गत मास्क न वापरणाऱ्या १०५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती सरपंच पुरुषाेत्तम चांदेकर व ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी संयुक्तरीत्या दिली.
दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणात खापरखेडा (ता. सावनेर) व परिसरातील गावांमध्ये काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेत आहेत. दुकानदारांनी त्यांची दुकाने नियाेजित वेळी सुरू व बंद करावी, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दी करणे टाळावे, विनामास्क व विनाकारण घराबाहेर पडू नये आदी सूचना नागरिकांना वेळाेवेळी देण्यात आल्या. हे संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने सक्तीच्या उपाययाेजना केल्या असल्या तरी नागरिक या उपाययाेजनांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे यात हयगय करणाऱ्या नागरिकांवर नाइलाजास्तव दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू केली आहे, असेही पुरुषाेत्तम चांदेकर व चंद्रकांत काळे यांनी सांगितले.
...
तीन दिवस बाजार बंद
होम क्वारंटाईन असलेले कोरोना पॉझिटिव्ह नागरिक फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापक कायदा २००५, कलम ५१, ५६ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सोबतच पाच हजार रुपये दंड ठाेठावून ताे वसूल केला जाईल. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार, २७, २८ व २९ मार्च राेजी संपूर्ण बाजारपेठ, मटन व चिकन मार्केट, भाजीपाल्याची दुकान, किराणा दुकान, बीअर बार, दारू दुकाने, रेस्टारेंट, हॉटेल, पूर्ण किरकोळ व छाेटी मोठे दुकाने दिवसभर बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी दिली.