नागपूरचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:20 AM2018-07-12T00:20:51+5:302018-07-12T00:22:10+5:30

आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. ओसीडब्ल्यूचे वरिष्ठ अभियंता भरत नारायण गावंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शेळके यांच्या विरोधात कलम २९४, ३२३, व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR has been registered against Nagpur corporator Bunty Shelke | नागपूरचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नागपूरचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसुपरवायझरला शिवीगाळ करून मारहाण


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. ओसीडब्ल्यूचे वरिष्ठ अभियंता भरत नारायण गावंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शेळके यांच्या विरोधात कलम २९४, ३२३, व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाल कोठीरोड परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या भागातील नागरिकांचे जुने नळ कनेक्शन बदलवून नवीन देण्यात आलेले आहेत. पाच दिवसापूर्वी लोहीवाडा परिसरातील सुयोग भगवंत अपार्टमेंट येथील एका महिलेने पाईपलाईन टाकल्याने केबल तुटल्याबाबत यशवंत उरकुडे यांना फोन केला. उरकुडे यांनी पाईपलाईनमुळे केबल तुटले नसल्याची खात्री करून दिली. त्यानंतरही शेळके यांनी बुधवारी सकाळी उरकुडे यांना फोन करून पुन्हा बोलावले. त्यानुसार उरकुडे शेळके यांच्या कार्यालयात पोहचले असता शेळके यांनी उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच गावंडे घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाईपलाईनमुळे केबल तुटले नसल्याचे पाईपलाईनच्या ठिकाणी खोदकाम करून स्पष्ट केले.

Web Title: FIR has been registered against Nagpur corporator Bunty Shelke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.