कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:04 PM2018-02-10T23:04:53+5:302018-02-10T23:08:03+5:30

धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून न देता त्यांच्याकडून काम करवून घेणाऱ्या कंपनी मालकासह तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

FIR registered company owner in case of death of worker | कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देगरम कोळसा अंगावर पडला : चार महिन्यांपूर्वीची दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून न देता त्यांच्याकडून काम करवून घेणाऱ्या कंपनी मालकासह तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घनश्याम सारडा, सुरेंद्र सिंग आणि सारसनाथ दुबे अशी या तिघांची नावे आहेत.
सारडा यांच्या मालकीची एमआयडीसीत सारडा पॉवर अ‍ॅन्ड स्टील कंपनी आहे. तेथे सुरेंद्र सिंग व्यवस्थापक तर दुबे शिफ्ट इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे. या कंपनीत धोक्याचे काम असूनही तेथे कामगारांसाठी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे. ३ आॅगस्ट २०१७ ला पहाटे ४ च्या सुमारास येथे काम करताना गरम कोळसा अंगावर पडून विजय दामोदर पात्रेकर (वय ३२, रा. पाटणसावंगी) या कामगाराला जबर दुखापत झाली. पाय, पोट, पाठ आणि बराचसा भाग जळाल्याने पात्रेकर गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे २६ सप्टेंबरच्या सकाळी १०.३० च्या सुमारास पात्रेकरचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून प्रकरण चौकशीत घेतले. चार महिन्यांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर या घटनेला कंपनी मालक सारडा, व्यवस्थापक सिंग आणि तेव्हाचा शिफ्ट इन्चार्ज दुबे कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानुसार, या तिघांवर कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: FIR registered company owner in case of death of worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.