आरामशीनला आग, लाखोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:23+5:302021-05-06T04:07:23+5:30

धुरामुळे गुदमरल्याने दोन कर्मचारी रुग्णालयात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लकडगंज परिसरातील दोन आरामशीनला बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास ...

Fire to the armchair, loss of millions | आरामशीनला आग, लाखोचे नुकसान

आरामशीनला आग, लाखोचे नुकसान

Next

धुरामुळे गुदमरल्याने दोन कर्मचारी रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लकडगंज परिसरातील दोन आरामशीनला बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या १० गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग आटोक्यात आणताना अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमन प्रवीण झाडे व सफाई कर्मचारी राजू अदमने यांचा धुरामुळे जीव गुदमरल्याने या दोघांनाही वर्धमाननगर येथील न्यू ईरा हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती लकडगंज केंद्र अधिकारी मोहन गुडधे यांनी दिली.

लकडगंज परिसरातील अश्विन टिंबर मार्ट व राजेंद्र टिंबर अशा दोन आरामशीनला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच लकडगंज केंद्राच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग मोठी असल्याने इतर केंद्रावरील गाड्यांची मदत घेण्यात आली. दहा गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. अश्विन टिंबर मार्टचे मालक अशोक ढोबळे व राजेंद्र टिंबर मार्टचे मालक राजेंद्र ढोबळे यांनी मे. परमात्मा एक फर्निचर व मे. शर्मा स्टार फर्निचर असे पोटभाडेकरू ठेवले आहे. आगीत अशोक ढोबळे यांची आरामशीन व जॉबवर्क मशीनचे अंदाजे १२ लाखाचे नुकसान झाले. अपना गुडस् गॅरेजचे अंदाजे दोन लाखाचे तर परमात्मा फर्निचरचे पाच लाखाचे नुकसान झाले. राजेंद्र ढोबळे यांच्या आरामशीनचे ११ लाखाचे नुकसान झाले. मे. शर्मा स्टार फर्निचरचे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. यामुळे आग आटोक्यात आणताना प्रवीण झाडे व राजू अदमने यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने न्यू ईरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले.

Web Title: Fire to the armchair, loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.