Nagpur | प्रवासी असलेल्या एसटी बसला आग; वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला

By नरेश डोंगरे | Published: August 29, 2022 01:59 PM2022-08-29T13:59:51+5:302022-08-29T14:06:10+5:30

गणेशपेठ बसस्थानकावरील घटना

Fire breaks out in ST bus carrying passengers; Passengers are safe as the incident was noticed in time | Nagpur | प्रवासी असलेल्या एसटी बसला आग; वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला

Nagpur | प्रवासी असलेल्या एसटी बसला आग; वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला

googlenewsNext

नागपूर : प्रवासी घेऊन गडचिरोलीकडे निघण्यासाठी तयार असलेल्या एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. वेळीच ही घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. गणेशपेठ बसस्थानकावर सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे बसस्थानकावरील प्रवासी आणि एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात काही वेळेसाठी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपूरहून गडचिरोलीकडे जाण्यासाठी सेमी लक्झरी बस सोमवारी सकाळी ७.३० वाजता गणेशपेठ बसस्थानकावर उभी होती. बसमध्ये २५ ते ३० प्रवासी बसले होते. काहींची चढ-उतर सुरू होती. एवढ्यात अचानक बसच्या इंजिनखालून धूर निघू लागला. त्यामुळे खाली उभे असलेल्या प्रवाशांनी आरडाओरड केली. बसचालक वाहकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तातडीने इतरांच्या मदतीने पाणी आणि अग्निशमन उपकरणाचा वापर करून आग विझविली. दरम्यान, बसमधून धूर निघत असल्याचे पाहून बसमधील प्रवाशांनी तातडीने खाली धाव घेतली. या घटनेची माहिती कळताच एसटीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चालक वाहकांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर ती बस दुरूस्तीसाठी आगारात पाठविली.

म्हणून लागली आग

बसच्या लाईटची वायरिंग शॉट झाली. वायरिंग जवळच डिझेल टँक असल्याने धूर निघू लागला. वेळीच घटना लक्षात आल्याने सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरूक्षीत आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक गजानन नागुलवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

मोठा अनर्थ टळला

फलाटावर बस उभी होती. त्यामुळे आगीचा भडका उडण्यापूर्वीच बाजुच्या प्रवाशांच्या लक्षात ही घटना आली. बस फलाट सोडून मार्गस्थ झाली असती अन् आग लागली असती तर रस्त्यावरच्या गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने बस फलाटावर असतानाच ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Web Title: Fire breaks out in ST bus carrying passengers; Passengers are safe as the incident was noticed in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.