रामझुल्याखालील रेल्वेच्या कचºयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:30 AM2017-10-29T01:30:32+5:302017-10-29T01:30:49+5:30
जयस्तंभ चौकाजवळील रामझुल्याखाली साचलेल्या कचºयाला शनिवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जयस्तंभ चौकाजवळील रामझुल्याखाली साचलेल्या कचºयाला शनिवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.
रामझुला टप्पा-१ च्या जयस्तंभ चौकाच्या उतार भागात खाली कचरा टाकला जातो. यात प्लास्टिकचाही समावेश आहे. पुलाखाली कचºयाचा ढीग साचला आहे. दुपारी अचानक कचºयातून धूर निघायला लागला. यामुळे वाहन चालक व ये-जा करणाºयांत घबराट पसरली.
थोड्या वेळात अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र अग्निशमन विभागाच्या गाडीमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आग आटोक्यात आणण्यात यश आले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत कचºयाच्या ढिगाºयातून धूर निघत होता.
रायपूर अग्निकांडाच्या
पुनरावृत्तीचा धोका
रायपूर रेल्वेच्या पार्किंग भागात काही महिन्यांपूर्वी भीषण आग लागली होती. यात अनेक वाहने खाक झाली होती. रामझुल्याखालीही रेल्वेचे र्पािर्कंग आहे. येथे दुचाकी वाहने ठेवली जातात. या वाहनांना आग लागली असती तर रायपूर अग्निकांडाची पुनरावृत्ती होण्याचा धोका होता.
रेल्वेने बनविले कचराघर
स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेचे अधिकारी झाडू मारताना दिसतात. परंतु रेल्वे स्टेशनवरील स्टॉल व डस्टबिनचा कचरा रामझुल्याखाली टाकला जातो. यात प्लास्टिकचाही समावेश आहे. वास्तविक रेल्वे प्रशासनाने महापालिकेला यासंदर्भात सूचना केल्यास येथील कचरा भांडेवाडी येथे नेता येतो. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
महापालिकेचे दुर्लक्ष
महापालिकेने कनक रिसोर्सेस यांच्याकडे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविली आहे. परंतु रामझुल्याखालील कचरा उचलला जात नाही. महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष आहे. रामझुल्याखाली कचरा नसता तर आगीची घटना घडली नसती.