नागपूर रेल्वेस्थानकावर उडाला आगीचा भडका, मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:15 PM2017-11-28T23:15:28+5:302017-11-28T23:16:25+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी ४.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६/७ मध्ये इटारसी एण्डकडील भागात अचानक आगीचा भडका उडाला.

Fire broke out at Nagpur railway station, big accident was avoided | नागपूर रेल्वेस्थानकावर उडाला आगीचा भडका, मोठी दुर्घटना टळली

नागपूर रेल्वेस्थानकावर उडाला आगीचा भडका, मोठी दुर्घटना टळली

Next
ठळक मुद्देभडकलेल्या आगीजवळ होती कोळशाची मालगाडी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी ४.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६/७ मध्ये इटारसी एण्डकडील भागात अचानक आगीचा भडका उडाला. आग लागल्याच्या दोन्ही बाजूला कोळशाने भरलेली मालगाडी उभी होती. सुदैवाने ही आग कोळसा असलेल्या मालगाडीपर्यंत पोहोचली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
नागपूर रेल्वेस्थानकावर कचरा जाळण्याची कुणालाच परवानगी नाही. परंतु तरीसुद्धा मंगळवारी दुपारी ४.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६/७ च्या मध्ये कुणीतही कचरा पेटवून दिल्यामुळे आगीचा भडका उडाला. आगीच्या दोन्ही बाजूला कोळशाने भरलेल्या मालगाड्या उभ्या होत्या तर ओएचई तारेचे खांबही तेथे होते. तेथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असल्यामुळे ही आग चांगलीच भडकली होती. सुदैवाने ही आग मालगाडीपर्यंत पोहोचली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काही वेळाने ही आग आपोआप आटोक्यात आली. एवढी मोठी आग लागूनही रेल्वेस्थानकावरील अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेला या आगीची माहिती नव्हती. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

 

 

Web Title: Fire broke out at Nagpur railway station, big accident was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग