नागपुरात शीतगृहाला आग; मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:25 AM2018-06-05T00:25:43+5:302018-06-05T00:26:29+5:30
भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.
लोकमत यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.
मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. शीतगृहातील एक भाग ओला करून आग आटोक्यात आणणे अपेक्षित होते. परंतु आग विझविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.
आग आटोक्यात न आल्यास संपूर्ण इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही आग आणखी १०-१५ दिवस कायम राहिल्यास मिरचीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेणे कठीण होईल. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊ न मिरचीच्या पोत्यावर पाण्याचा मारा
के ल्यास आग आटोक्यात येईल. मात्र आग विझविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
शीतगृहाच्या काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग आहे. मिरची ठेवण्यात आलेल्या भागावर पाण्याचा मारा केल्यास धुराचे लोळ निर्माण होतील. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अधिक त्रास होईल. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी आग आटोक्यात आणता येत नाही. ज्या भागात आगीचे लोळ दिसत आहेत त्या भागात अग्निशमन विभागाचे जवान २४ तास पाण्याचा मारा करीत असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी दिली.