अग्निशमन विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा

By admin | Published: April 16, 2016 02:34 AM2016-04-16T02:34:01+5:302016-04-16T02:34:01+5:30

शहराचा विकास होत आहे. मिहान, मेट्रो यासाखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. शहराचा वाढता व्याप व उभ्या राहात

The Fire Department should use the latest technology | अग्निशमन विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा

अग्निशमन विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा

Next

प्रवीण दटके : अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमात शानदार प्रात्यक्षिके
नागपूर : शहराचा विकास होत आहे. मिहान, मेट्रो यासाखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. शहराचा वाढता व्याप व उभ्या राहात असलेल्या गगनचुंबी इमारती विचारात घेता अग्निशमन दलाने साधनामध्ये काळानुरुप बदल करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा, असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी केले. अग्निशमन सेवा दिवसानिमित्त चिटणवीस पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरवर्षी महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर हा कार्यक्रम आयोजित केला जात होता. परंतु यंदा प्रथमच मुख्यालयाबाहेर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर आमदार अनिल सोले, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, विधी समितीचे सभापती अ‍ॅड. संजय बालपांडे, झोन सभापती प्रभा जगनाडे, मनीषा कोठे, उपायुक्त रंजन लाडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, जयंत दांडेगावकर, अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके आदी उपस्थित होते.
अग्निशमन विभागाला गौरवशाली परंपरा आहे. जवान मर्यादित साधनात जीवाची पर्वा न करता कर्तव्य भावनेतून काम करीत असतात. याची जाणीव विद्यार्थी, नागरिक व व्यावसायिकांना व्हावी, या हेतूने हा कार्यक्र म लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने चिटणवीस पार्क येथे आयोजित करण्यात आला. पुढील वर्षात भव्य प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी टीटीएल खरेदीसाठी तरतूद केली असून ती लवकरच विभागाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती दटके यांनी दिली. अग्निशमन विभागात जबाबदारी उत्तमपणे बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन उभे असते. ही सेवा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्त्वाची आहे. प्रत्येक इमारतीत स्वत:ची अग्निशमन सुरक्षा यंत्रणा असली पाहिजे. यासाठी अधिकाधिक इमारतींचे फायर आॅडिट करण्याची गरज असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. कर्तव्य बाजवताना मृत्यू झालेल्या जवानांना शहीद समजण्यात यावे, अशी सूचना बंडू राऊ त यांनी केली. प्रारंभी विभागातील शहीद जवानांना दटके, हर्डीकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
विभागात सेवा बजावलेल्या शहीद कुुटुंबीयातील चंद्रकला कुहीकर व शांताबाई ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊ न गौरव करण्यात आला. गोंदिया येथे बोअरवेल दुर्घटेनत बालकाचे प्राण वाचविल्याबद्धल स्थानाधिकारी धर्मराजजी नाक ाडे, जी.एन. कावळे, सी.एस. बालपांडे व पंधरे आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच विभागातर्फे आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. राजेंद्र उचके यांनी प्रास्ताविकातून वर्षभरातील विभागाच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी एन.के.गुडधे, आर.आर दुबे, आर.एम. सिरकीरवार, एस.के. काळे, सुनील राऊ त, केशव कोठे, जगदीश बैस, सी.बी.तिवारी, एस.एम. डहाळकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: The Fire Department should use the latest technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.