रेल्वे प्लॅटफार्मच्या ड्रेनेज लाईनमध्ये आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:36 AM2017-11-01T01:36:29+5:302017-11-01T01:36:43+5:30

रेल्वे स्टेशनच्या पूर्व द्वारावर प्लॅटफार्म क्रमांक ६ व ७ च्या मधे असलेल्या ड्रेनेज लाईनमधून मंगळवारी सकाळी अचानक आगीच्या ज्वाळा निघाल्याने स्टेशन परिसरात खळबळ उडाली.

Fire in drainage line of railway platform | रेल्वे प्लॅटफार्मच्या ड्रेनेज लाईनमध्ये आग

रेल्वे प्लॅटफार्मच्या ड्रेनेज लाईनमध्ये आग

googlenewsNext
ठळक मुद्देस्टेशन परिसरात धावपळ : ज्वलनशील द्रव्याबाबत माहिती नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे स्टेशनच्या पूर्व द्वारावर प्लॅटफार्म क्रमांक ६ व ७ च्या मधे असलेल्या ड्रेनेज लाईनमधून मंगळवारी सकाळी अचानक आगीच्या ज्वाळा निघाल्याने स्टेशन परिसरात खळबळ उडाली. ड्रेनेजमधून पेट्रोल आणि डिझेलसारखे ज्वलनशील द्रव्य वाहत असल्याचे आढळल्याने रेल्वे कर्मचाºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अग्निशमन विभागाच्या मदतीने वेळेवर आग नियंत्रित केल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ९ च्या सुमारास प्लॅटफार्म ६ व ७ च्या मधे ड्रेनेज लाईनमधून आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या. यापासून थोड्याच अंतरावर दुचाकीचे पार्किंग स्टॅन्ड आहे. ही आग थोड्याच वेळात पूर्व गेटच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडे संत्रा मार्केटला लागून असलेल्या नाल्यापर्यंत पोहचली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळावर पोहचले. ड्रेनेज लाईनच्या पाण्यावर पेट्रोल, डिझेलसारखे ज्वलनशील द्रव्य आढळून आल्याने कर्मचाºयांनी फोमच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन कर्मचाºयांच्या प्रयत्नामुळे काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन विभागाची गाडी उशिरा रात्रीपर्यंत स्टेशन परिसरात ठेवण्यात आली.
ड्रेनेज लाईनच्या पाण्यामध्ये पेट्रोलचा शिरकाव कुठून झाला ही बाब समजू शकली नाही. अग्निशमन अधिकारी ए.बी. गोडे यांच्यानुसार प्लॅटफार्म क्र. ६ व ७ अंतर्गत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनमध्ये दूषित पाण्यावर पेट्रोल तरंगताना आढळले. यामुळे ड्रेनेज लाईनच्या खालोखाल पेट्रोलची पाईपलाईन असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. मात्र ड्रेनेजमध्ये पेट्रोल मिश्रणाचे केंद्र समजू शकले नाही. यामुळे इंडियन आॅईलचे अधिकारी पराग डोंगरे, कमलेश कुमार आणि रेल्वे स्टेशनचे अधिकारी योगेश पाठक यांना तत्काळ बोलाविण्यात आले. यावेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी उचके, दुधे आदी घटनास्थळावर पोहचले. प्लॅटफार्म क्रमांक १ पासून ८ पर्यंत तपासणी करण्यात आली. मात्र पेट्रोलचा गंध आला नाही.
केवळ डिझेल फिलिंग सेंटर
नागपूर रेल्वे स्टेशनवर गाड्यांच्या इंजिनसाठी केवळ डिझेल फिलिंग सेंटर असून तेही प्लॅटफार्मपासून बºयाच अंतरावर आहे. मात्र पेट्रोल फिलिंग सेंटर कुठेही नाही. असे असताना ड्रेनेज लाईनमध्ये पेट्रोलचा शिरकाव कुठून झाला, हा चौकशीचा विषय ठरला आहे.
 

Web Title: Fire in drainage line of railway platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.