नागपुरातील अत्रे ले-आऊट येथील फायनान्स कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:38 PM2018-10-30T23:38:29+5:302018-10-30T23:39:10+5:30
अत्रे ले-आउट येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात कार्यालयातील फर्निचर, संगणक, दस्ताऐवज जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अत्रे ले-आउट येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात कार्यालयातील फर्निचर, संगणक, दस्ताऐवज जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले.
अत्रे ले-आऊट येथील पीतांबर नामक दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर एसडीबी फायनान्स सर्व्हिसेस कंपनीच्या नागपूर शाखेचे कार्यालय आहे तर इमारतीच्या वरच्या मजल्यावर निवासी फ्लॅट आहेत. नागरिकांना पहाटे ६.३० च्या सुमारास कंपनीच्या कार्यालयातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी याची माहिती शाखा व्यवस्थापक सौरभ कोल्हटकर यांना दिली. त्यांची अग्निशमन विभागाला माहिती दिली.
आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरला होता. त्यामुळे आतील आग नियंत्रणात आणता येत नव्हती. घटनास्थळी पोहचलेल्या नरेंद्रनगर येथील अग्निशमन केंद्राचे प्रमुख धर्मपाल नाकोड व कर्मचारी दत्ता भोकरे यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच दराच्या काच तुटल्याने दोघाच्या हातावर जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत कार्यालयातील दोन प्रिंटर, तीन संगणक, तीन एसी, फर्निचर व कार्यालयीन दस्तावेज नष्ट झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आली. अन्यथा वरच्या मजल्यापर्यंत आग पोहचली असती तर मोठा अनर्थ घडला असता.