मिहानमध्ये बसला आग : इंजिनमध्ये शॉर्टसर्किंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:50 PM2019-01-24T23:50:10+5:302019-01-24T23:52:20+5:30
मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली.
ही घटना दुपारी १२.५० वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) सेंट्रल फॅसिलिटी इमारतीसमोर घडली. वाहनचालकाने सकाळी ९.३० च्या सुमारास टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोहोचविले. दुपारी चालक बसमध्ये डिझेल भरून परत येत असताना त्याला बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसून आले. तो खाली उतरून इंजिन पाहू लागला. त्यावेळी इंजिनमधून आग निघू लागली आणि बसमध्ये पसरली. आगीत बसमधील संपूर्ण सिट जळल्या, पण टायरला आग लागली नाही. या घटनेची माहिती त्वरित एमएडीसीच्या अग्निशमन केंद्राला देण्यात आली. पाच मिनिटात आगीचे बंब घटनास्थळी येऊन आग विझविली. गाडीत चालक एकटाच असल्यामुळे जीवितहानी टळली. आगीत बसचे नुकसान झाले.