रविवारी अग्निशमन सेवा दिन : वर्षभरात १ हजार ७६ कोटींची मालमत्ता वाचविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 08:36 PM2019-04-13T20:36:12+5:302019-04-13T20:37:31+5:30
नागपूर शहर व परिसरात गेल्या वर्षभरात ११९२ आगीच्या घटना घडल्या. यात १५२ मोठ्या आगी, २८६ मध्यम तर ७५४ आगी लहान स्वरुपाच्या होत्या. लागलेल्या आगी नियंत्रणात आणून अग्निशमन विभागाच्या जवानांनी १ हजार ७६ कोटी २६ लाखांची मालमत्ता नुकसान होण्यापासून वाचविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर व परिसरात गेल्या वर्षभरात ११९२ आगीच्या घटना घडल्या. यात १५२ मोठ्या आगी, २८६ मध्यम तर ७५४ आगी लहान स्वरुपाच्या होत्या. लागलेल्या आगी नियंत्रणात आणून अग्निशमन विभागाच्या जवानांनी १ हजार ७६ कोटी २६ लाखांची मालमत्ता नुकसान होण्यापासून वाचविली.
वर्षभरात १३२ मॉकड्रील
नैसर्गिक आपत्ती, आगीपासून बचाव कसा करावा, याची नागरिकांना माहिती असल्यास नुकसान टाळणे शक्य आहे. याचा विचार करता महापालिके च्या अग्निशमन विभागातर्फे गेल्या वर्षभरात शहराच्या विविध भागात १३२ मॉकड्रील प्रशिक्षण सत्राचे आयोजन क रण्यात आले. यातून ३२ हजार ८७६ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा अभाव असूनही विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.
मनुष्यबळाचा अभाव
अग्निशमन विभागात एकूण ८७२ पदे मंजूर आहेत. सध्या १५८ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. ७१४ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाचा अभाव असूनही विभाग तत्परतेने कार्य करीत आहे. तसेच विभागाला १.९८ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांची शुल्क वसुली करण्यात आली.
शहीद जवानांना रविवारी मानवंदना
लंडनहून १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई येथील गोदीत आलेल्या जहाजाला लागलेली आग विझविताना हौतात्म्य पत्करलेल्या ६६ जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी अग्निशमन सेवा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त मनपा मुख्यालय परिसरात आज रविवारी सकाळी ७ वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे. यात शहिदांना अभिवादन केल्यानंतर कवायत होणार आहे.यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अग्निशमन व विद्युत सेवा समिती सभापती लहुकुमार बेहते व आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील.अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
वर्षभरातील दृष्टिक्षेप
- एकूण लागलेल्या आगी : ११९२ (७५४ लहान, २८६ मध्यम, १५२ मोठ्या)
- अंदाजे नुकसान : ३४ लाख ३८ हजार ८८५
- मालमत्ता वाचविली : १ अब्ज, ७६ कोटी, २६ लाख ७७ हजार ६५
- एकूण आपत्कालीन घटना : ७३९(विहीर व तलाव घटनांचा समावेश)
- कॉल्स : १४२
- एकूण विहिरी उपसा : ३४०५ मनपा झोनअंतर्गत उपसा,२१० खासगी विहिरी
- एकूण मॉकड्रील : १३२