गाेठ्याला आग, बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:34+5:302021-05-26T04:09:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : घराशेजारी असलेल्या गाेठ्याला अचानक आग लागली. त्यात गाेठ्यातील एका बैलाचा हाेरपळून मृत्यू झाला तर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : घराशेजारी असलेल्या गाेठ्याला अचानक आग लागली. त्यात गाेठ्यातील एका बैलाचा हाेरपळून मृत्यू झाला तर दुसरा बैल थाेडक्यात बचावला. मात्र ही आग वेळीच नियंत्रणात न आल्याने गाेठ्यातील गुरांचे वैरण, बैलगाडी व इतर शेतीपयाेगी साहित्य पूर्णत: जळाले. यात अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. ही घटना पारशिवनी तालुक्यातील करंभाड येथील नवीन वस्तीत साेमवारी (दि. २४) दुपारी घडली.
करंभाड नवीन वस्ती येथील रहिवासी गजानन गुरव यांच्या घरालगतच गुरांचा गाेठा आहे. या गाेठ्यात बैलजाेडी, तणस, बैलगाडी व इतर शेतीपयाेगी साहित्य हाेते. दरम्यान, साेमवारी दुपारच्या सुमारास गाेठ्याला अचानक आग लागली. ही आग वेळीच नियंत्रणात न आल्याने एका बैलाचा हाेरपळून मृत्यू झाला. दुसरा बैल गाेठ्यातून बाहेर निघाल्याने ताे बचावला. गाेठ्यातील गुरांचे वैरण, बैलगाडी व इतर साहित्य जळून खाक झाले. ३५ हजारांचा बैल व शेतीपयाेगी साहित्य असे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी गुरव यांनी दिली.
गाेठ्याला आग लागल्याचे समजताच गावातील तरुणांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. शिवाय, खापा येथील अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले हाेते. परंतु अग्निशमन पथक पाेहोचेपर्यंत आग आटाेक्यात येऊन गाेठा पूर्णत: जळून खाक झाला हाेता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संताेष वैरागडे यांनी पाेलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आगीचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पारशिवनी पाेलीस करीत आहेत.
===Photopath===
250521\img-20210524-wa0008.jpg
===Caption===
गोठ्याला आग