नववर्षाच्या स्वागतात फटाक्यांच्या आतषबाजीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 09:13 PM2020-12-29T21:13:02+5:302020-12-30T00:53:53+5:30
New Year, Fireworks ban, nagpur newsकाेरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षाचा जल्लोष करताना सार्वजनिक ठिकाणी, तलावाच्या काठावर गर्दी करू नका, घरातच राहून नववर्षाचे स्वागत करा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. फटाक्यांची आतषबाजी, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असून याबाबतचे दिशनिर्देश जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षाचा जल्लोष करताना सार्वजनिक ठिकाणी, तलावाच्या काठावर गर्दी करू नका, घरातच राहून नववर्षाचे स्वागत करा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. फटाक्यांची आतषबाजी, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असून याबाबतचे दिशनिर्देश जारी केले आहेत.
नववर्षाला फुटाळा, अंबाझरी, गांधीसागर तलाव, धरमपेठ, इतवारी, महाल आदी ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तलाव व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता आरोग्याची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे, ६० वर्षावरील नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांचे सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळावे.
नववर्षाचे स्वागत करताना फिजिकल डिस्टन्स पाळले जाईल, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याचे कटाक्षाने पालन करावे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात अशावेळी गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सचे पालन होईल याची विशेष काळजी घ्यावी. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करू नये, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
नियमाचे उल्लघन करणाऱ्यांवर कारवाई
उपरोक्त आदेशाचे कुणाकडूनही उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१ व ६० नुसार तसेच भारतीय दंड संहिता मधील कलम १८८नुसारस कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.